‘मी करिना कपूर सारखी नाही’, ट्रोल करणाऱ्यांना समीराचं उत्तर

समीराने इन्टाग्रामवर बेबीबंपसोबत फोटो शेअर केला होता

समीरा रेड्डी

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा मातृत्वाचं सुख अनुभवणार आहे. समीरा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून या प्रेग्नंसी काळातले काही फोटो समीरा सोशल मीडियावर शेअर करत आहे. मात्र शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचं वाढलेलं वजन स्पष्टपणे दिसत आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. ट्रोल झाल्यानंतर समीराने ट्रोलकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

“प्रेग्नसींच्या काळात स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक स्थितीमध्ये अनेक बदल होत असतात. महिल्यांच्या शरीररचनेत दिवसेंदिवस बदल होत असतो. प्रत्येकाची शरीररचना वेगवेगळी असते. त्यामुळे हे असे बदल होणं सहाजिकचं आहे. या दिवसांमध्ये काही जणी करिना कपूर सारख्या फिट दिसतात. म्हणून प्रत्येक महिला या काळात करिना कपूरसारखीच हॉट आणि सेक्सी दिसेलच असं नाही ना ? काही जणींचं वजन माझ्यासारख्या वाढतं. मी करिना कपूर नाही त्यामुळे माझं हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मला बराच कालावधीही लागेल”, असं समीरा म्हणाली.


दरम्यान, समीरा दुसऱ्यांदा आई होणार असून तिने तिच्या बेबीबंपसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मात्र तिचे फोटो पाहुन नेटकऱ्यांनी तिला चांगलं ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना प्रेग्नसींच्या काळात ट्रोल करण्यात आलं आहे. ऐश्वर्या राय- बच्चन, मीरा राजपूत, नेहा धुपिया या अभिनेत्रींना प्रेग्नसींच्या काळात त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pregnant sameera reddy gave a tight slap on the face of trollers with her reaction

ताज्या बातम्या