बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटाने एकेकाळी रुपेरी पडदा गाजवला होता. तिने आपला मोर्चा ‘आयपीएल’कडे वळविला आणि ती अभिनयापासून दुरावली. परंतु आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. जेने गुडेनफ या आपल्या अमेरिकन बॉयफ्रेण्डसोबत लवकरच ती लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. सध्या आपला लग्नाचा विचार नसल्याचे सांगत तिने या वृत्ताचे खंडन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जानेवारी महिन्यात अमेरिकेत जाऊन प्रिती जेनेसोबत शुभमंगल करणार असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. अतिशय गुप्तपणे पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्यास दोघांच्या परिचयाच्या अतिशय जवळच्या व्यक्ती उपस्थित राहाणार आहेत.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहणारा जेने व्यवसायाने ‘फायनान्शियल अॅनेलिस्ट’ असून प्रितीपेक्षा एक वर्षांनी लहान आहे. त्याची आणि प्रितीची पहिली ओळख अमेरिकेत झाली. बऱ्याच काळापासून दोघांचे जवळचे संबंध आहेत. प्रितीच्या संघाचा उत्साह वाढविण्यासाठी यावर्षी जेनेने ‘आयपीएल’ सामन्यांना उपस्थिती लावली होती. याआधी प्रितीचे नाव प्रसिद्ध व्यावसायिक नेस वाडियाबरोबर जोडले गेले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preity zinta cen tie the knot in jan
First published on: 24-11-2015 at 15:10 IST