उद्योगपती नेस वाडियाने ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान शिवीगाळ करून आपला विनयभंग केल्याच्या आरोपावर अभिनेत्री प्रीती झिंटा ठाम आहे. मात्र, वानखेडेवरील १७२ फिरत्या कॅमेऱ्यांत तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही नेस व प्रीती यांच्यातील वादाचे चित्रिकरण पोलिसांना आढळून आलेले नाही. आता सामन्याचे चित्रिकरण करणाऱ्या सोनी टीव्हीच्या १९ कॅमेऱ्यांची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रीतीने मात्र घटनेचे साक्षीदार असलेल्या १४ जणांची नावे पोलिसांना सादर केली आहेत. त्यात तिच्या एका अमेरिकन मित्राचाही समावेश आहे. या अमेरिकन मित्राने मध्यस्ती करत नेस वाडियाला अडविले होते.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2014 रोजी प्रकाशित
नेस वाडियाने शिवीगाळ केलीच
उद्योगपती नेस वाडियाने ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान शिवीगाळ करून आपला विनयभंग केल्याच्या आरोपावर अभिनेत्री प्रीती झिंटा ठाम आहे.
First published on: 26-06-2014 at 06:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preity zinta ness wadia spat