“अभिनेत्री अधिक मानधन मागत असेल तर…”: करीनासंदर्भातील प्रश्नावर ‘सुची’चं सूचक विधान

प्रियामनीने एका मुलाखतीत मानधनातील फरकाबद्दल वक्तव्य केलं आहे.

priya mani on kareena kapoors sitas role
करीनाने सीतेच्या भूमिकेसाठी १२ कोटी रुपयांची मागणी केल्यानंतर सुरु झालेल्या मानधनाच्या फरकाबद्दल प्रियामणीने वक्तव्यं केलं आहे.

बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर काही दिवसांपूर्वी सीतेच्या भूमिकेमुळे चर्चेत आली होती. या भूमिकेसाठी करीनाने १२ कोटी रुपयांची मागणी केली अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे आता करीनाच्या जागेवर दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरु असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या काळात मानधन हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. तापसी पन्नू आणि सोनम कपूर सारख्या अनेक अभिनेत्रींनी मुलाखतीत वगैरे यांनी देखील यावर बरीच चर्चा केली. आता करीनाला ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री प्रियामणीने पाठिंबा दिला आहे.

प्रियामणीने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने या विषयी चर्चा केली आहे. “मानधनातील फरकाबद्दल बोलायचं झालं तर एखादी स्त्री एवढी मागणी करत असेल तर ती त्यासाठी पात्र असते. याविषयी तुम्ही प्रश्न विचारायला नको असे मला वाटते. कारण अधिक मानधन मागण्यात काहीही चूक नाही,” असे प्रियामणी म्हणाली.

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

आणखी वाचा : ‘दोन ऐवजी एक पोळी खाईन, पण तुझ्यासारखी पत्नी नको’, ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री झाली ट्रोल

पुढे प्रियामणी म्हणाली, “यशस्वी असलेल्या अभिनेत्रींने काही ठरावीक मानधनाची मागणी केली तर त्यात काही चूक नाही. बऱ्याचवेळा आम्ही अभिनेत्यांच्या मानधनाविषयी चर्चा करणारे लेख वाचतो. आता या महिला अशा टप्प्यावर पोहोचल्या आहेत की जिथे त्यांना काय पाहिजे हे त्या सांगू शकतात. फक्त तुम्हाला हे चुकीचं असल्याचं वाटतं याचा अर्थ असा नाही की ती महिला त्या भूमिकेसाठी पात्र नाही. यामुळे तुम्ही त्या महिलेवर कमेंट करू शकत नाही. ”

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Priya mani said kareena kapoor khan can ask for the high fees she deserves it dcp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या