बॉलिवूड अभिनेत्री विविध कारणांसाठी कायमच चर्चेत राहत असतात.गेल्या काही दिवसांपासून अशीच दोन अभिनेत्रींची बरीच चर्चेत आहे. या अभिनेत्री म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन. सध्या दोघींच्या चर्चेसोबतच त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.
नुकत्याच या दोघी न्युयॉर्कमध्ये नों टिफनी अॅण्ड कोजच्या ब्लू बूक कलेक्शनच्या एका कार्यक्रमामध्ये एकत्र दिसून आल्या. यावेळी या दोन्ही अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त अंदाजामध्ये दिसून येत होत्या. विशेष म्हणजे या दोघींचाही वावर पाहता या गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या चांगल्या मैत्रीण असल्याचा भास होत होता.
या कार्यक्रमातील प्रियांका-किमचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये या दोन्ही अभिनेत्रींनी एक खास पोझ दिली आहे. यावेळी प्रियांकाने पेस्टल रंगाचा बॅकलेस सिक्वेंस ड्रेस परिधान केला होता. तर किमने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यासोबतच तिने सिल्वर रंगाचे दागिनेही घातले होते. विशेष म्हणजे प्रियांकाने केलेल्या गेटअपमुळे ती किमपेक्षा जास्त उठून दिसत असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, या कार्यक्रमामध्ये प्रियांकासोबत हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. सध्या प्रियांकाच तिच्या लग्नाच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. तर किम कर्दाशियनदेखील तिच्या ट्विटरवरील फॅन फॉलोइंग आणि अधुनमधून इंटरनेटवर लीक होणारे व्हिडीओ यांमुळे सतत चर्चेत असते.