बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राच्या ‘एक्झॉटिक’ अल्बमने युट्यूबवर धमाल उडवून देत नवा इतिहास रचला आहे. गतवर्षी प्रदर्शित झालेल्या या गाण्याच्या व्हिडिओने युट्यूबवर चार कोटीचा आकडा पार केला आहे. प्रियांकाने प्रसिध्द अमेरिकन गायक पिटबुलबरोबर ‘एक्झॉटिक’ गाणे गायले आहे. हे गाणे हिंदी आणि इंग्रजी अशा देन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. चार कोटीपेक्षा अधिक लोकांनी या गाण्याला पसंती देऊन एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापीत केला आहे. या गाण्यात देशी तडक्याबरोबर विदेशी संगीतसुध्दा जोडले गेले आहे. आपल्या या यशामुळे प्रियांका कमालीची खुश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2014 रोजी प्रकाशित
प्रियांका चोप्राच्या ‘एक्झॉटिक’ अल्बमने रचला नवा इतिहास
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राच्या 'एक्झॉटिक' अल्बमने युट्यूबवर धमाल उडवून देत नवा इतिहास रचला आहे.
First published on: 09-06-2014 at 06:14 IST
TOPICSप्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra exotic ft pitbull new record

