अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लुकमुळे कायम चर्चेत असते. ‘मेट गाला’नंतर प्रियांकाने तिचा आगामी चित्रपट लव्ह अगेनच्या प्रीमियरसाठी रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. यावेळी प्रियांकाने हॅरिस रिड याने डिजाइन केलेला ‘ब्लीच्ड डेनिम ड्रेस’परिधान केला होता. या ड्रेसमध्ये प्रियांका एखाद्या राणीसारखी दिसत होती. परंतु हा ड्रेस खूप मोठा होता आणि त्यात प्रियांकाने हाय हिल्स घातल्यामुळे ती रेड कार्पेटवर पडली. या संपूर्ण प्रसंगाबाबत ‘द व्ह्यू’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने खुलासा केला आहे.

हेही वाचा : समलिंगी विवाहाबाबत भूमी पेडणेकरचे स्पष्ट मत! म्हणाली, “देवाने आपल्या सर्वांना…”

प्रियांका या मुलाखतीदरम्यान म्हणाली, “मी जेव्हा सर्व लोकांसमोर रेड कार्पेटवर पडले तेव्हा मला अगदीच लाजल्यासारखे झाले कारण, त्याठिकाणी असंख्य पापाराझी आणि पत्रकार उपस्थित होते. पण, एका गोष्टीमुळे अजूनही हैराण आहे. ती म्हणजे, त्यापैकी उपस्थित एकाही पापाराझीने माझे फोटो किंवा व्हिडीओ काढले नाहीत. मी या प्रसंगाबाबत कुठेही बोलले नाही कारण, असे व्हिडीओ व्हायरल झालेले मी यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावर पाहिले आहेत.”

प्रियांका पुढे म्हणाली, “मी या ड्रेसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त उंच हिल्स घातल्या होत्या जेणेकरून मी या ड्रेसमध्ये परफेक्ट दिसेन परंतु रेड कार्पेटवर पडल्यावर काही मिनिटे मला काहीच सुचत नव्हते. पण, कोणीही व्हिडीओ किंवा फोटो न काढता कॅमेरे खाली ठेवले, मी माझ्या २३ वर्षांच्या करिअरमध्ये एकदाही असे पाहिले नव्हते. मी रेड कार्पेटवर पडले त्याची एकही क्लिप सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली नाही. सर्व पापाराझींनी केवळ बातमीचा विचार न करता ‘माणुसकी’ दाखवली आणि कॅमेरे खाली ठेवले.”

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’मध्ये व्हिलनची भूमिका का निवडली? अभिनेत्री म्हणाली, “मी स्वत: हा निर्णय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रियांकाचा चित्रपट ‘लव्ह अगेन’ यूएस चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित ५ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सॅम ह्यूघन आणि सेलीन डीओन हे कलाकार देखील आहेत. आतापर्यंत या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.