Premium

प्रियांकाने अमेरिकेत सुरु केला नवा व्यवसाय, एका कप-बशीची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

या वस्तूंच्या किंमती खूप जास्त असल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

priyanka-chopra
प्रियांका चोप्रा

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. प्रियांका चोप्रा ही आजच्या काळात जागतिक स्टार म्हणून ओळखली जाते. प्रियांका चोप्रा हे नाव आता फक्त अभिनयापुरते मर्यादित राहिलेले नाही. नुकतंच प्रियांकाने आणखी एक व्यवसाय सुरु केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रियांका चोप्राने नुकतंच सोना होम नावाचा नवीन भारतीय होमवेअर लाइनअप लाँच केलं आहे. याद्वारे तिने ऑनलाईन भांडी विकायला सुरुवात केली आहे. ही ऑनलाईन वेबसाईट लाँच केल्यानंतर तिला ट्रोल केले जात आहे. या साईटवरील वस्तूंच्या किंमती या खूप जास्त असल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आले कारण

सोना होम ब्रँडच्या ऑफिशिअल वेबसाईटनुसार, त्यातील एका टेबल क्लॉथची किंमत ३० हजार ६१२ रुपये आहे. तर चार डिनर नॅपकिनच्या सेटची किंमत तब्बल १३ हजार २८४ रुपये आहे. तर एका प्लेटची किंमत ४ हजार ७३३ रुपये आहे. त्यासोबतच एका सर्व्हिंग बाऊलची किंमत ७ हजार ७३२ रुपये आहे. तर चहाचा कप आणि बशीची किंमत ५ हजार ३६५ रुपये असून एका कपची किंमत ३ हजार ४७१ रुपये आहे. प्रियांका चोप्राच्या या कलेक्शनची किंमत ऐकून लोक हैराण झाले आहेत. तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

निक जोनसने लग्नात मंगळसूत्र घातल्यावर कसं वाटलं? प्रियांका चोप्रा म्हणाली “माझ्यासाठी तो…”

दरम्यान प्रियांका चोप्राने नुकतंच सिटाडेल या वेबसीरीजची शूटींग पूर्ण केली आहे. त्यासोबत ती लवकरच ‘इट्स ऑल कमिंग बैक टू मी’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच ती जी ले जरा या बॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे. यात प्रियांकासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट स्क्रीन शेअर करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-07-2022 at 08:14 IST
Next Story
“माझं लग्न तीन वेळा ठरलं पण…”, ४६ वर्षीय सुष्मिता सेनने केला खुलासा