रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने जगभरातील लोक विचारात पडले आहेत. महायुद्ध सुरु होणार का असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने युक्रेन संकटावर प्रतिक्रिया दिली आहे. एक व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने ही परिस्थिती भयानक असल्याचे म्हणतं युनिसेफच्या वतीने मदतीसाठी आवाहन केले आहे.

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवच्या स्टोरीवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत युक्रेनमधील लोकांची कशी परिस्थिती झाली आहे हे दाखवल आहे. रशियन हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये अराजकतेचे वातावरण असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सगळ्या स्टेशनचे रुपांतर हे भूमिगत बंकरमध्ये करण्यात आले आहे. लोक स्वतःला आणि त्यांच्या प्रियजनांना हल्ल्यापासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : “मलाच सगळं करावं लागत अन् माझ्या भावाला….”; अमिताभ बच्चन यांच्या नातीने घरात होणाऱ्या भेदभावावर केले होते वक्तव्य

आणखी वाचा : “२ नाही ४ पेन किलर घ्याव्या लागल्या…”, आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची केआरकेने उडवली खिल्ली

हा व्हिडीओ शेअर करत “युक्रेनमधील परिस्थिती भयानक आहे. निष्पाप लोक त्यांच्या जीवनासाठी आणि त्यांच्या प्रियजनांच्या जीवनासाठी भीतीने जगत आहेत, तर दुसरीकडे भविष्यातील अनिश्चितता समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आधुनिक जगात अशा भयानक परिस्थितीबद्दल समजणे खूप कठीण आहे, परंतु ही अशी वेळ आहे ज्याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल. या युद्धक्षेत्रात निष्पाप लोक राहत आहेत. तेही तुमच्या आणि माझ्यासारखे लोक आहेत,” असे कॅप्शन प्रियांकाने दिले आहे.

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील लोक विचारात पडले आहेत. तर या सगळ्यावर प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पाठिंबा दिल्याबद्दल नेटकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी जगाला युद्ध नको, शांतता हवी आहे, कृपया निरपराध लोकांना वाचवा, असेही म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत जगभरातील लोकांनी पुढे यावे, जेणेकरून अशा परिस्थितीतून सुटका होईल, असे आवाहन काही लोक करत आहेत.