बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत तिच्या नव्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तरुणपिढी तिची फॅशन स्टाईल बऱ्याच वेळा फॉलो करताना देखील दिसते. पण नुकताच प्रियांकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमधील लूकमुळे प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
प्रियांकाने नव्या लूकमधील व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अनोखी हेअरस्टाईल केली आहे. तसेच ती एका गाण्यावर बाथरोब परिधान करुन थिरकताना दिसत आहे. पण प्रियांकाची ही अनोखी हेअरस्टाईल चाहत्यांना फारशी आवडलेली दिसत नाही. त्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
एका यूजरने प्रियांकाच्या या व्हिडीओवर ‘ही कोणती हेअरस्टाईल आहे? पर्वत’ अशी कमेंट केली आहे. तर एका यूजरने ‘केसांचा पर्वत’ अशी कमेंट केली आहे. आणखी एका यूजरने ‘शाकालाका बुमबुम मालिकेमधील पेन्सिल जर माणूस असती तर अशी दिसली असती’ असे म्हटले आहे.
सध्या प्रियांकाच्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिला ट्रोल केले आहेत तर काहींनी तिचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.
