बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून निकचे आडनाव काढून टाकले होते. त्यानंतर जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्टमध्ये प्रियांकाने ती जर अचानक सिंगल झाली तर ती कोणत्या हॉलिवूड कलाकारासोबत रिलेशनमध्ये येईल ते सांगितले.

या शो दरम्यान, प्रियांका निकला रोस्ट करत म्हणाली, जर हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थ सिंगल असेल तर ती त्यांच्याशी लग्न करेन. ती पुढे म्हणाली, “जेव्हा निकशी लग्न केले होते. तेव्हा प्रत्येकाला आश्चर्य झाले होते. मी सीरिअस आहे. जो पर्यंत क्रिस हेम्सवर्थ सिंगल होत नाही. तो पर्यंत गोष्टी बदलू शकतात” आणि हे ऐकल्यानंतर निक हसू लागतो.

आणखी वाचा : “कोण अक्षय कुमार…”, लग्नाची भविष्यवाणी ऐकल्यावर ट्विंकल खन्ना पडली होती गोंधळात

आणखी वाचा : Big Boss Marathi 3 जिंकल्यानंतर विशाल निकम अडकणार लग्न बंधनात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, क्रिस हेम्सवर्थची थॉर ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. क्रिस हेम्सवर्थने स्पॅनिश अभिनेत्रीशी लग्न केले आहे. तर त्यांना तीन मुलं आहेत. प्रियांका आणि निकने २०१८मध्ये जोधपुरमध्ये लग्न केले.