scorecardresearch

प्रसिद्ध गायिका टीना टर्नर यांचे निधन; वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टीना टर्नर यांना ‘रॉक अँड रोल’ची क्वीन म्हटले जायचे.

TINA-TURNER-
प्रसिद्ध गायिका टीना टर्नर यांचे निधन (छायाचित्र इंडिया एक्सप्रेस)

प्रसिद्ध गायिका टीना टर्नर यांचे बुधवारी वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. टीना टर्नर यांच्या मॅनेजरने याबाबत माहिती दिली. टीना गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होत्या. टीना टर्नर यांना ‘रॉक अँड रोल’ची क्वीन म्हटले जायचे. टीना यांच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

टीना टर्नर यांच संगीत विश्वात एक मोठे नाव होते. संगीत क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. टीना टर्नर यांचे बालपणीचे नाव अॅना माई बुलॉक होते. पन्नासच्या दशकात त्यांनी गायनाची सुरुवात केली. १९६० मध्ये त्यांचे ‘अ फूल इन लव्ह’ हे गाणे हिट झाले. यानंतर टीना टर्नर यांनी अनेक संगीत अल्बम केले, जे पुढे जाऊन हिट ठरले.

हेही वाचा- “माझं बाळ रडायचं आणि मी…,” ‘स्लमडॉग मिलिनियर’ फेम फ्रीडा पिंटोला प्रेग्नन्सीनंतर आलं होतं डिप्रेशन, खुलासा करत म्हणाली…

साल १९८८ मध्ये टीना टर्नर यांच्या एक शोमध्ये एक लाख ८० हजार लोक सहभागी झाले होते. हा जगातील सर्वात मोठा शो मानला जातो. टीना टर्नर केवळ गायिकाच नाही तर अभिनेत्रीही होत्या. त्यांनी काही चित्रपटांमध्ये कामही केले होते. २००४ मध्ये टीना टर्नर एका चित्रपटात काम करणार होत्या. या चित्रपटाचे नाव होते ‘देवी’. या चित्रपटात टीना टर्नर यांना ‘माँ काली’ची भूमिका मिळाली होती. द जुगरनॉटच्या वृत्तानुसार, टीना टर्नर ‘माँ काली’च्या भूमिकेच्या तयारीसाठी भारतात आल्या होत्या. भारतात त्यांनी काही मंदिरांना भेटही दिली होती.

हेही वाचा- ‘केनडी’ चित्रपट बनवल्यानंतर अनुराग कश्यप झाला गरीब; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

टीना टर्नर यांचे पहिले लग्न इके टर्नर यांच्याशी झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले. नंतर टीना यांनी १९८६ मध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले, ज्यामध्ये त्यांनी पहिल्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला. टीना टर्नर यांनी सांगितले होते की त्यांचे पती इके टर्नर त्यांच्यावर खूप अत्याचार करायचे. एकदा नवऱ्याने त्यांच्या चेहऱ्यावर गरम कॉफी फेकली होती. यात टीना टर्नर गंभीर भाजल्या होत्या. नंतर पतीने त्यांच्या नाकावर इतका जोरात ठोसा मारला होता की, त्याचा परिणाम नंतरही राहिला. टीना टर्नर जेव्हा गाणे गायच्या तेव्हा त्यांच्या तोंडातून रक्त यायचे. नंतर टीना टर्नर यांनी २०१३ मध्ये एर्विन बाख यांच्याशी लग्न केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-05-2023 at 19:29 IST

संबंधित बातम्या