फुल्ल ऑफ ऍक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. थरारक दृश्ये, ऍक्शन सीन्स आणि बाजूला लव्हस्टोरी असलेल्या या टीझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. चित्रपटाचा टीझर पाहता साऊथ स्टाईलची कमतरता कुठेही भासत नाही आहे. तर कलाकारांच्याही यांत दमदार भूमिका असणार आहेत, हे टीझरमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. राम शेट्टी निर्मित 'राडा' या चित्रपटाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड, योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांना पाहणे रंजक ठरणार आहे.आणखी वाचा-सेक्सबद्दल प्रश्न विचारणाऱ्या युजरवर भडकली उर्फी जावेद, म्हणाली… दिग्दर्शक रितेश सोपानराव नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना व एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटातबाबतची उत्सुकता आणखीच ताणली गेली असेल यांत शंकाच नाही, त्यामुळे येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'राडा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.