अभिनेता आणि मॉडेल राहुल देवने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल खुलासा केलाय. पत्नीच्या निधनानंतर एकल पालक म्हणून आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी चार वर्षांहून अधिक काळ राहुलने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर पुन्हा इंडस्ट्रीमध्ये परत येण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. २००९ मध्ये राहुलच्या पत्नीचे निधन झाले होते.

“मी १०० कोटींच्या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं, पण नंतर काम मिळालंच नाही”; अभिनेत्याने व्यक्त केली खंत

अलिकडेच एका मुलाखतीत राहुलने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, “मी यासाठी अजिबात तयार नव्हतो आणि हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान होते. माझ्याबाबतीत जे घडलं ते कुणाच्याही बाबतीत घडू नये, एवढीच माझी इच्छा आहे.” राहुलचा मुलगा इंग्लंडमध्ये कॉलेजला गेल्यानंतर त्याने मुंबईला परतण्याचा आणि इंडस्ट्रीतील करिअर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याने कनेक्ट एफएम कॅनडाला सांगितले, “तुम्ही विचार करा की मी ब्रेक घेण्यापूर्वी इंडस्ट्रीत इतकं काम करूनही मला बिग बॉसमध्ये जावं लागलं. मी बिग बॉस १० मध्ये गेलो त्याचं फक्त एकमेव कारण होतं की त्यावेळी माझ्याजवळ कोणतंच काम नव्हतं. मी यासाठी कोणाला दोष देणार नाही, कारण इंडस्ट्रीत गोष्टी फार लवकर बदलतात आणि साडेचार वर्ष हा खूप मोठा काळ आहे.”

शाहरुखमुळे रितेशला लागली ‘ही’ सवय; म्हणाला, “त्या दिवशी पहिल्यांदाच मला…”

राहुल देवने त्याला या कठीण काळात मदत करणाऱ्यांची नावेही सांगितली. तो म्हणाला, ‘मी इंडस्ट्रीत परत येऊ शकलो याला अनेक लोक जबाबदार आहेत.’ त्याने छायाचित्रकार-निर्माता अतुल कसबेकर, चित्रपट निर्माते निखिल अडवाणी, सुनील शेट्टी, रोहित धवन, अनीस बज्मी यांचेही मदतीबद्दल आभार मानले.

नात आराध्या नाराज झाल्यावर काय गिफ्ट देता? बिग बी खुलासा करत म्हणाले, “तिला गुलाबी…”

एकट्या पालकाने मुलांचं संगोपन करण्याबद्दल बोलताना राहुल म्हणाला, “एकट्याने पालकत्व अजिबात सोपे नाही. मुलांचे संगोपन करण्यात स्त्रियांचा मोठा हात असतो, ज्या पद्धतीने त्या मुलांना समजून घेतात, तसं शक्य नाही. मुलांना मोठं करताना स्त्रियांकडे जसा संयम असतो, तसा संयम ठेवण्याचा मी खूप प्रयत्न केला, परंतु बऱ्याचदा मी माझा सयंम गमावून बसायचो. माझ्या मुलासाठी मी आई आणि बाबा दोन्ही बनण्याचा प्रयत्न करावा लागला,” असं राहुलने सांगितलं.