बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने शनिवारी गणपती बाप्पाचे विसर्जन केले. याचा एक व्हिडिओ तिचा पती राज कुंद्राने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत एक ट्वीट केलं. या ट्विटमध्ये त्याने हॅशटॅगसह मीडिया, सत्य आणि चाचणी असे शब्द वापरले आहेत. राज कुंद्राला मागच्या वर्षी जुलैमध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. चौकशी आणि तपासानंतर त्याला २० सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर राज कुंद्राने वर्षभरानंतर पहिल्यांदाच ट्वीट केलं आहे.
राज कुंद्राने त्यांच्या घरी झालेल्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि तिची आई देखील गणपती विसर्जन करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिलं, “‘तुम्ही जे पाहता ते केवळ तुम्ही काय पाहता यावर अवलंबून नाही, तर तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून पाहता यावरही अवलंबून आहे.”
आणखी वाचा- KBC 14 : एकाही स्पर्धकाला देता आलं नाही ‘या’ सोप्या प्रश्नाचं उत्तर, तुम्हाला माहितीये का?
राज कुंद्राने आपल्या ट्विटसह दृष्टीकोन, मीडिया, ट्रायल, पीस, पॅशन, बाप्पा मोरया, सत्य असे हॅशटॅग वापरले आहेत. हा ४५ सेकंदाचा व्हिडिओ ड्रोनच्या सहाय्याने शूट करण्यात आला आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात राजचे नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते आणि त्याला मागच्या वर्षी जुलैमध्ये अटक करण्यात आली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता.
आणखी वाचा- अश्लील चित्रफित निर्मितीच्या आरोपांतून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी राज कुंद्राचा न्यायालयात अर्ज
जामीन मिळाल्यानंतर राज कुंद्राने मीडिया आणि सोशल मीडियावपासून दूर राहणेच पसंत केले. तो अनेकदा वेगवेगळे मुखवटे घालून फिरताना दिसला होता. याशिवाय जेव्हा तो पत्नी शिल्पा आणि कुटुंबासह बाहेर जातो तेव्हा तो कॅमेऱ्यांसमोर आपला चेहरा दाखवण्याचे टाळतो. या अटकेवर आणि प्रकरणावर राजने अद्याप जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही, तसेच शिल्पानेही या प्रकरणावर भाष्य करणे टाळले आहे.