“अश्लील नव्हे तर न्यूड फिल्म बनवायचो”; राज कुंद्रा प्रकरणात चौकशी दरम्यान तनवीर हाशमीचा खुलासा

न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

raj-kundra-arrested-porn-film-case-
(File Photo/Raj Kundra)राज कुंद्राच्या कंपनीतील चार कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १९ जुलैला राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचा उलगडा होवू लागला आहे. तर राज कुंद्राच्या कंपनीतील चार कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

याचवेळी अश्लील सिनेमांची निर्मिती करण्याचे आरोप असलेल्या तनवीर हाशमी या व्यक्तीने राज कुंद्राबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. तनवीर हाशमी सध्या जामिनावर बाहेर आहे. मुंबई क्राइम ब्रांचने तनवीर हाशमीला चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी आपला राज कुंद्राशी थेट संबंध नसल्याचं तनवीर हाशमी म्हणाला. तसचं राज कुंद्रा अश्लील नव्हे तर न्यूड फिल्म बनवायचा असा खुलासा तनवीरने केलाय.

हे देखील वाचा: राज कुंद्रा प्रकरणात पुन्हा एकदा गहना वश‍िष्ठला पोलिसांसमोर लावावी लागणार हजेरी

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार चौकशी दरम्यान तनवीर म्हणाला, ” मला क्राइम ब्रांचने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र मी क्राइम ब्रांचला स्पष्ट केलंय मी आजवर राज कुंद्राला भेटलो नाही.” यावेळी तनवीरने त्याने काही प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट बनवला असला तरी थेट राज कुंद्रासाठी काम केलं नसल्याचं स्पष्ट केलं. तनवीरला त्याने कशाप्रकराचा कंटेंट बनवला हे विचारण्यात आलं होतं. यावर तो म्हणाला ” आम्ही २०-२५ मिनिटांच्या शॉर्ट फिल्म बनवायचो. ज्यात न्यूडिटी होती मात्र तुम्ही त्याला अश्लील नाही म्हणू शकत. हा मात्र हे सॉफ्ट अडल्ट सिनेमा होते असं म्हणू शकतो.” असं आरोपी तनवीर हाशमी चौकशीत म्हणाला.

शुक्रवारी राज कुंद्राच्या घरी मुंबई पोलिसांनी छापा टाकत तपास केला होता. यावेळी पोलिसांना घरात एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विआन आणि जे.एल. स्ट्रीम कंपनीच्या कार्यालयात एक लपवलेलं कपाट सापडलं आहे. तसंच त्यांच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅझेट आढळून आली, ती जप्त करण्यात आली आहेत. २० जलैला राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj kundra porn film case tanveer hashmi revels mumbai crime branch we are making nude films not porn films kpw