बॉलीवूड सुपरस्टार त्यांच्या प्रतिमेबद्दल खूप काळजी घेतात. कोणत्या कार्यक्रमासाठी कोणत्या प्रकारचा आऊटफिट घालायचा याचादेखील ते खूप विचार करतात. परंतु, राजेश खन्ना या बाबतीत अधिक जागरूक होते. शबाना यांनी स्वतः एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्याबद्दलची ही घटना सांगितली होती.
शबाना आझमी म्हणालेल्या, “मी आणि राजेश खन्ना एका चित्रपटात एकत्र काम करीत होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते आले तेव्हा त्यांच्या बोटाला लागले होते. एका पत्रकाराने येऊन विचारले होते की, तुम्हाला काय झाले? तर त्यांनी (राजेश खन्ना) उत्तर दिले- काल मी माझ्या चित्रपटात घोडेस्वारीचा सीन करीत होतो. त्या सीनदरम्यान मी घोड्यावरून पडलो.” त्या मुलाखतीत शबाना आझमी त्यांच्याबरोबर होत्या आणि त्या स्वतःवर नियंत्रण ठेवू शकल्या नाहीत.
शबाना आझमी म्हणालेल्या की, त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले की, आपण काल एकत्र काम करत होतो आणि तिथे तू काहीपण…. शबाना हे बोलताच राजेश खन्ना यांनी त्यांना टेबलाखालून लाथ मारली. मी गप्प राहिले. पत्रकार निघून गेल्यावर राजेश खन्ना शबाना आझमींवर खूप रागावले. शबाना आझमी म्हणाल्या, “तो मला म्हणाला – तुला राजा हरिश्चंद्र होण्याची काय गरज होती? तू तुझं तोंड का उघडलंस?”
शबाना आझमी यांनी सांगितले की, राजेश खन्ना यांनी त्यांना फटकारले आणि त्यांनी दुखापतीचं खरं कारणही सांगितले. त्यानंतर राजेश खन्ना यांनी शबाना आझमींना सांगितले- “काल माझा पाय लुंगीत अडकला होता. त्यामुळेच माझ्या बोटाला लागलं होतं. आता मी सुपरस्टार राजेश खन्ना आहे. मी त्यांना हे सांगेन का?” शबाना आझमींना समजलं की, राजेश खन्ना यांनी त्यांची प्रतिमा लक्षात ठेवून ही गोष्ट उघड केली नाही.”
१९८३ सालच्या ‘अवतार’ या चित्रपटातून राजेश खन्ना यांनी बॉलीवूडमध्ये दमदार पुरागमन केले होते. ‘अवतार’ हा चित्रपट खूपच मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला. जवळपास दशकभराच्या अपयशानंतर राजेश खन्ना यांनी एक मोठा हिट दिला. त्यानंतर आलेले त्यांचे ‘सौतन’ आणि ‘अगर तुम ना होते’ हे चित्रपटही यशस्वी ठरले. मोहन कुमार दिग्दर्शित ‘अवतार’मध्ये राजेश खन्ना यांच्याबरोबर शबाना आझमी मुख्य भूमिकेत होत्या. आनंद बक्षी यांनी लिहिलेली या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली.