Rajinikanth Fitness : रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षीही रजनीकांत नवीन कलाकारांना मागे टाकत आहेत. त्यांचा अभिनय सर्वोत्तम आहे आणि त्यांनी स्वतःला इतके तंदुरुस्त ठेवले आहे की कोणीही म्हणू शकत नाही की ते ७४ वर्षांचे आहेत.
रजनीकांत यांनी ‘कुली’ चित्रपटात अद्भुत अॅक्शन सीन्स केले आहेत. त्यांची ऊर्जा लोकांना प्रेरणा देते. पण, तुम्हाला माहिती आहे का, रजनीकांत या वयातही आनंदी आणि फिट राहण्यासाठी काय करतात? चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो.
रजनीकांत यांचा एक वर्कआउट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर लोक त्यांच्यासारखे वर्कआउट करू लागले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रजनीकांत यांचे वर्कआउट रूटीन
व्हायरल व्हिडीओमध्ये रजनीकांत लाल रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेले दिसत आहेत. ते डंबेल उचलत आहेत आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सिट-अप्स करत आहेत. अशाप्रकारे रजनीकांत त्यांची हेल्दी फिजिक मेंटेन करतात. व्यायामाबरोबरच, रजनीकांत त्यांच्या डाएटवरही लक्ष केंद्रित करतात. ते डाएट आणि व्यायाम संतुलित करून स्वतःला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात.
Superstar workout ?️♂️❤️?pic.twitter.com/arASMUgVO3
— AmuthaBharathi (@CinemaWithAB) August 15, 2025
रजनीकांत यांचे जेवण खूप साधे आणि घरगुती असते. रजनीकांत ताज्या हंगामी भाज्या, प्रथिनेयुक्त पदार्थ आणि कडधान्य खातात. ते साखर, जास्त मीठ, प्रोसेस्ड फूड आणि मांसाहारी पदार्थ टाळतात. यामुळे त्यांचे पचन सुधारण्यास मदत होते. ते दारू आणि सिगारेटपासून पूर्णपणे दूर राहतात. रजनीकांत यांच्या आरोग्याचे रहस्य फक्त जिम किंवा डाएट नाही तर त्यांच्या नातेसंबंधांमध्येदेखील आहे. त्यांना असे वाटते की, चांगले आरोग्य फक्त शरीराशी संबंधित नाही तर मन आणि नातेसंबंधांशीदेखील संबंधित आहे. रजनीकांत यांना कुटुंब आणि मित्रांबरोबर वेळ घालवणे आवडते.
रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई करत आहे. जगभरात या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५० कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात या चित्रपटाने ६५ कोटींची कमाई केली आहे. ‘कुली’ चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर नागार्जुन, श्रुती हासन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात आमिर खानचाही कॅमिओ आहे.