रजनीकांतचा जेलर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३१८ कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान, हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या एका दृश्यात, कॉन्ट्रॅक्ट किलर आरसीबीच्या जर्सीत दाखवण्यात आला असल्याने हा वाद निर्माण झाला. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. आता यावर सुनावणी करत उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांना १ सप्टेंबरपर्यंत त्या सीनमधून जर्सी काढून टाकण्यास सांगितले आहे.

सुनावणीदरम्यान, न्यायालयाला सांगण्यात आले की, रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या दाव्यात, पहिल्या सुनावणीनंतर, चित्रपटातील आरसीबी जर्सीच्या दृश्यावर कोर्ट काय निर्णय देतं याकडे बऱ्याच लोकांचं लक्ष होतं, आता तो सीन बदलण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. चित्रपटाचे निर्मातेही यासाठी तयार आहेत अन् लवकरच हा सीन हटवण्यात येणार आहे.

आणखी वाचा : “आणखी किती लुटणार…” मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलबद्दल किशोर कदम यांची खरमरीत पोस्ट

ही गोष्ट नुकतीच रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ध्यानात आली की जेलर चित्रपटात एक सीन आहे ज्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट किलर ‘आरसीबी’ची जर्सी घालून एका महिलेबद्दल अपमानजकारक भाष्य करत आहे, त्यानंतर त्यावर आक्षेप घेत त्यांनी कोर्टाकडे धाव घेतली. धाव घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सीनमुळे ब्रँडचं नाव खराब होत असल्याने प्रायोजक नाराज होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यामुळेच आता १ सप्टेंबरपासून चित्रपटातील हा सीन हटवण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर’मध्ये रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि कॉमेडियन योगी बाबू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यासोबतच मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांनी कॅमिओ भूमिका केल्या आहेत. चित्रपटात रजनीकांत यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.