सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. रजनीकांत यांनी त्यांच्या कामाने संपूर्ण जगभर त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही त्यांनी यश मिळवलं. रजनीकांत यांच्या अभिनयात अशी जादू आहे की चाहते त्यांना देवाचा दर्जा देतात. वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत नव्या कलाकारांना टक्कर देताना दिसतात. त्यांच्या कामबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ते नेहमी चर्चेत असतात. त्यांचे लता यांच्याशी लग्न होण्यापूर्वी ते दुसऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडले होते.

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरूमध्ये झाला. चित्रपट सृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करताना त्यांना खूप कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं.आज रजनीकांत त्यांची पत्नी लता रजनीकांतसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. त्याची लता यांच्याबरोबरची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. मात्र, त्यांच्याशी लग्न होण्यापूर्वी रजनीकांत दुसऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडले होते.

आणखी वाचा : हिंदी मनोरंजन सृष्टीतील ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, साखरपुडा संपन्न

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, पत्नी लताच्या आधी रजनीकांतच्या आयुष्यात आणखी एक मुलगी आली होती. त्या मुलीवर रजनीकांत यांचे खूप प्रेम होते. रिपोर्ट्सनुसार, डॉ. गायत्री श्रीकांत यांनी ‘द नेम इज रजनीकांत’ हे रजनीकांत यांचे चरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी याबद्दलही लिहीलं आहे. रजनीकांत जेव्हा बंगळुरूमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होते तेव्हा ते एका मुलीच्या प्रेमात पडले होते. त्यांना त्या मुलीशी लग्नही करायचं होतं, पण ते होऊ शकलं नाही.

हेही वाचा : अक्षय कुमार नाही तर ‘हे’ दाक्षिणात्य अभिनेते आहेत सर्वाधिक कमाई करणारे कलाकार, मानधनाचे आकडे ऐकून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते फक्त एक आकर्षण होतं, जे काही काळाने संपलं. त्यानंतर त्यांना अनेकदा नकारही मिळाला. एका मुलीने त्यांचा रंग काळा आहे असं म्हणत त्यांना नाकारले होतं. काही काळानंतर रजनीकांतच्या आयुष्यात लता आल्या. दोघांची लव्हस्टोरी अप्रतिम आहे. रिपोर्ट्सनुसार, १९८० मध्ये लता रजनीकांतची त्यांच्या कॉलेज मॅग्झिनसाठी मुलाखत घ्यायला आल्या होत्या आणि लता यांना बघता क्षणी रजनीकांत त्यांच्या प्रेमात पडले. मुलाखत संपल्यानंतर रजनीकांत यांनी लताला प्रपोज केलं होतं. दोघांनी १९८१ मध्ये लग्न केलं. त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत.