बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला 83 हा बहुप्रतिक्षित चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. रणवीर सिंहच्या 83 चित्रपटाला बॉलिवूडकरांसह चित्रपट समीक्षकांनी फार चांगला प्रतिसाद दिला. संपूर्ण टीमच्या अभिनयापासून ते दिग्दर्शक कबीर खानच्या दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान नुकतंच दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रजनीकांत हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांनी नुकतंच 83 हा चित्रपट पाहिला. यानंतर त्यांनी अधिकृत ट्विटरवर ट्वीट करत याबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, ‘#83TheMovie वाह काय चित्रपट आहे….शानदार!!! निर्माते, कलाकार आणि क्रू यांचे खूप खूप अभिनंदन, असे ट्वीट त्यांनी केले आहे. त्यासोबत त्यांनी याद्वारे कबीर खान, कपिल देव, रणवीर सिंग यांना टॅग करत त्यांचे कौतुक केले आहेत.

दरम्यान रणवीर सिंगचा ’83’ चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मात्र त्याला प्रेक्षकांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळताना दिसत नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडलेली नाही. यावेळी सेलिब्रिटींसाठी एक स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. जिथे चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांनी सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले.

तसेच या चित्रपटावर करोनाचे संकट आहे. ओमिक्रॉनने अनेक राज्यांमध्ये कहर करायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र वेगवेगळे नियम लागू केले जात आहेत. दिल्लीत यलो अलर्ट जारी करून ‘मिनी-लॉकडाऊन’ लागू करण्यात आला आहे. यामुळे जिम, स्पा सेंटर्ससह चित्रपटगृहेही बंद करण्यात आली आहेत. याचा चित्रपटाच्या कमाईवर नक्कीच परिणाम होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणवीर सिंहच्या ‘83’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. या चित्रपटाच्या यशाचं श्रेय रणवीरनं त्याच्यासोबत काम केलेल्या सहकलाकारांना दिलं. आहे. एकीकडे या चित्रपटासाठी दिग्दर्शक कबीर खानचं कौतुक केलं जात आहे. तर दुसरीकडे रणवीर- दीपिकाच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटात रणवीरनं भारताचे माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.