गेल्या दोन वर्षांपासून इंटरनेट बँकिंगचा ट्रेंड वाढत चालला आहे. पण त्यासोबत सायबर गुन्ह्यातही वाढ होत असल्याचे दिसत आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याने देखील त्याच्या चाहत्यांना याबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. राजकुमार रावच्या नावे बनावट ईमेल आयडी तयार करुन कोट्यावधी रुपये मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर स्क्रीनशॉट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

राजकुमार राव याने या बनावट ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात एक विशिष्ट मेल लिहिलेला दिसत आहे. ‘हाय अर्जुन, माझी मॅनेजर सौम्या आणि तुमच्या शेवटच्या संभाषणानंतर मी ‘हनीमून पॅकेज’ या उल्लेख केलेला चित्रपट करण्यासाठी तयार आहे. हा चित्रपट संतोष मस्के यांनी लिहिला असून तो ते दिग्दर्शितही करत आहे. मी सध्या प्रत्यक्ष मुंबईत उपस्थित नसल्यामुळे ईमेलद्वारे माझी चित्रपटासाठी संमती पाठवत आहे.

या चित्रपटावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया, स्क्रिप्टचे वाचन करणे आणि कराराच्या हार्ड कॉपीचे काम मी मुंबईत आल्यावर केले जाईल. हा करार तेव्हाच विचारात घेतला जाईल जेव्हा करारावर स्वाक्षरी केलेली ३ कोटी १० लाख रुपये (एकूण शुल्काच्या ५० टक्के) रक्कम माझ्या बँक खात्यात जमा केली जाईल. किंवा माझ्या व्यवस्थापकाने नमूद केल्यानुसार तुम्ही १० लाख रुपये रोख आणि 3 कोटी चेकद्वारे देत ​​आहात. मी येत्या ६ जानेवारी रोजी हैदराबाद राणोजी स्टुडिओमध्ये चित्रपटाची कथा ऐकण्यासाठी येत आहे. त्यामुळे तुम्ही दिग्दर्शक आणि निर्माते यांना सर्व मेलसह येथे आमंत्रित करावे – राजकुमार राव, असे या मेलमध्ये लिहिण्यात आले आहे.

“सलमानने माझी फसवणूक केली, मी त्याच्यासाठी…”, सोमी अलीने केला धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या बनावट मेलचा स्क्रीन शॉट शेअर करत राजकुमार रावने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. #FAKE कृपया अशा बनावट लोकांपासून सावध रहा. सौम्या नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. हे लोक बनावट ईमेल आयडीचा वापरून लोकांना मूर्ख बनवत आहेत, असे सांगत त्याने चाहत्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.