scorecardresearch

Raju Srivastav Video : राजू श्रीवास्तव यांनी केला होता यमराज आणि मृत्यूचा उल्लेख, व्हिडीओ व्हायरल

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Raju Srivastav Video : राजू श्रीवास्तव यांनी केला होता यमराज आणि मृत्यूचा उल्लेख, व्हिडीओ व्हायरल
या व्हिडिओमध्ये राजू श्रीवास्तव यांनी यमराज आणि मृत्यूचा उल्लेख केला होता.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. १० ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृतीबाबत डॉक्टरांनी काल माहिती दिली होती. चाहते आणि कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव गजोधर भैय्या नावाने ओळखले जातात आणि अशात आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राजू श्रीवास्तव यांनी यमराज आणि मृत्यूचा उल्लेख केला होता.

राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तव त्यांच्या गजोधर शैलीत बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात, “नमस्कार, काही नाही, निवांत बसलो आहे. आयुष्यात असं काम कर की यमराज आला तरी तुम्हाला न्यायला तर तो म्हणाला पाहिजे, भाऊ तुम्ही रेड्यावर बसा. तुम्ही चालत आहात, हे योग्य दिसत नाही. तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात.” आता त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा-“आता पाणी डोक्यावरून जातंय…” ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर विजय वर्माची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आणि त्याच दिवशी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. पण ते अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. मधल्या काळात त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा- Raju Shrivastav Health Update: चिंता वाढवणारी बातमी! एहसान कुरेशी म्हणाले, “एखादा चमत्कारच…”

सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन, एहसान कुरैशी, राजपाल यादव यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील सर्वच व्यक्ती राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raju srivastav old video goes viral when he mention about death and yamraja mrj

ताज्या बातम्या