आजवर बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे राकेश रोशन यांचा आज जन्मदिवस. ६ सप्टेंबर १९४९ मध्ये मुंबईमध्ये जन्म झालेल्या राकेश रोशन यांनी १९७० साली ‘घर घर की कहानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.  तेव्हापासून आजतागायत ते बॉलिवूडमध्ये सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मात्र या कारकिर्दीमध्ये त्यांनी फार कमीवेळा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केल्याचं पाहायला मिळालं.

राकेश रोशन यांनी दिग्दर्शक,अभिनेता, निर्माता अशा विविधांगी भूमिका आतापर्यंत पार पाडल्या आहेत. आजवर त्यांनी निर्मिती किंवा दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये अनेक कलाकारांची वर्णी लागली आहे. मात्र त्यांच्या फार कमी चित्रपटांमध्ये बिग बी झळकल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे दोन्ही कलाकार आघाडीचे अभिनेता असूनही फार क्वचित वेळा त्यांनी रुपेरी पडद्यावर स्क्रिन शेअर केली आहे.

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

राकेश रोशन यांच्या चित्रपटामध्ये झळकण्यास बिग बी यांनी ऐनवेळी नकार दिल्यामुळे त्यांच्या नात्यात फूट पडल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे बिग बींनी नकार दिल्यानंतर जॅकी श्रॉफची या चित्रपटात वर्णी लागल्याचं दिसून आलं.

राकेश रोशन दिग्दर्शित ‘किंग अंकल’ हा चित्रपट १९९३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेमध्ये झळकले असून  यांच्यापूर्वी या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या नावाचा विचार सुरु होता. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये बिग बी झळकणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र ऐनवेळी बिग बींनी या चित्रपटाला नकार दिला. त्यामुळे राकेश रोशन बिग बीवर नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, बिग बींच्या या एका नकारामुळे या दोघांच्याही नात्यामध्ये कटूता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर या दोघांनी अनेक वेळा एकमेकांसमोर यायचंही टाळल्याचं पाहायला मिळत आहे.