Video : ‘ड्रामा क्वीन’ राखीचा नवा ड्रामा, भलत्याच मागणीमुळे दुबईतील व्यक्तीही वैतागला

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून अभिनेत्री राखी सावंत ओळखली जाते.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून अभिनेत्री राखी सावंत ओळखली जाते. राखी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतंच राखी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दुबईला गेली होती. त्या ठिकाणचा राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राखीने एका दुबईतील व्यक्तीकडे अनोखी मागणी केली. राखीची ही मागणी ऐकून त्या व्यक्तीने करोनाचा बहाणा देत तिथून पळ काढताना दिसत आहे.

नुकतंच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत राखी ही दुबईतील एका कार्यक्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा अजब ड्रेस परिधान केला होता. त्यासोबत तिने सोनेरी रंगाचे चमकदार शूज आणि डोक्यावर एक सुंदर मुकूट परिधान केला होता. यात ती प्रचंड सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत एक दुबईत राहणारा एक व्यक्ती पाहायला मिळत आहे. राखीने पापराझींसमोर त्याच्यासोबत काही फोटो काढताना दिसत आहे.हे फोटो काढत असताना अचानक ती त्या व्यक्तीचा हात पकडते आणि त्याच्याकडे गोल्डन व्हिसा (Golden Visa) ची मागणी करते.

“सर सर सर, दुबई गोल्डन व्हिसा,” असे राखी यावेळी म्हणते. हे ऐकून तो व्यक्ती दोन मिनिट शांत बसतो. त्यानंतर खोकतच करोनाचा बहाणा करत पळून जाताना दिसतो. मात्र त्यानंतरही राखी गुडघ्यावर बसून त्याचा हात धरुन त्याच्याकडे पुन्हा गोल्डन व्हिसा मागताना दिसते.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फक्त गंमत म्हणून हा व्हिडीओ करण्यात आला असला तरी यावर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rakhi sawant ask for golden visa from dubai an event video viral nrp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या