बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. राखी सावंत मागच्या काही काळापासून आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. आपल्या या नव्या रिलेशनशिपमुळे ती सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. अनेकदा ती आदिलबरोबर दिसते. आदिल आणि राखीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. दरम्यान, सध्या ती एका सर्जरीसाठी रुग्णालयात आहे. तिचा रुग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राखीला रुग्णालयातही डान्स करण्याचा मोह आवरला नाही. हातात ट्यूब असूनही ती अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्या ‘लायगर’ चित्रपटातील ‘जवानी तेरी आफत है’ या गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसली. व्हिडीओत सुरुवातील राखी एकटीच डान्स करत असते, नंतर तिच्यासह तिचा बॉयफ्रेंड आदिलही डान्स करताना दिसतोय. “डान्स कुठल्याही परिस्थितीत मला सोडत नाही, सर्जरी आधीचा डान्स,” असं कॅप्शन राखीने हा व्हिडीओ शेअर करताना दिलंय.

दरम्यान, राखीची कशाची सर्जरी होणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती तिने दिलेली नाही. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिला सर्जरी कशाची आहे, याबद्दल विचारणा केलीये. तर, काहींनी तिच्या डान्सचं कौतुक करत लवकर बरी हो, अशा शुभेच्छा दिल्या आहे.

राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिलबद्दल बोलायचं झाल्यास तो मुळचा मैसूरचा आहे. आदिलचा बहीण शैली ही राखी सावंतची चांगली मैत्रीण आहे. तिच्याच माध्यमातून राखी आणि आदिलची ओळख झाली होती. आदिल हा एक बिझनेसमन असून काही दिवसांपूर्वीच त्यानं राखीला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली होती. ज्याची बरीच चर्चा झाली होती.