राखी सावंत आपल्या आईबद्दलची प्रत्येक माहिती सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिची आई जया सावंत सध्या कॅन्सरसाठीचे उपचार घेत आहे. तिचा एक नवा व्हिडिओ राखीने शेअर केला आहे.
राखीच्या आईच्या उपचाराचा भाग असलेली शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ती हळूहळू बरी होत आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात राखीची आई दवाखान्यात चालताना दिसत आहे. राखीने या व्हिडिओला कॅप्शनही दिलं आहे. या कॅप्शनमध्ये ती म्हणते, आईचा हॉस्पिटलमधला कॅटवॉक.
View this post on Instagram
तिच्या या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री जरीन खानने आई लवकर बरी व्हावी म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.त्याचबरोबर राखीच्या अनेक चाहत्यांनीही तिची आई लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे आणि कमेंट्स करत शुभेच्छाही दिल्या आहेत.
याआधी राखीने तिच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती सलमान खानचे आभार मानत होती. सलमानने राखीला तिच्या आईच्या उपचारांसाठी मदत केली होती. राखी बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये दिसली होती. यात ती अंतिम फेरीपर्यंतही पोहोचली होती. मात्र आईच्या उपचारासाठी तिने १४ लाख रुपये घेऊन शो सोडण्याचा निर्णय घेतला.