बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच राखीने इन्स्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. यात ती फार ग्लॅमरस दिसत असली तरी नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
राखी ही नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. तिने इन्स्टाग्रामवर नुकतंच काही फोटो पोस्ट केले आहेत. यात ती तिच्या काही फिरंगी मित्रांसह आणि हॉलिवूड स्टार्स सोबत दिसत आहे. यात राखीने तिच्या मित्रांप्रमाणेच हटके लूक केला आहे. तिची स्टाईल आणि लूक अगदी तिच्या मित्रांप्रमाणेच पाहायला मिळत आहे.
राखीने पोस्ट केलेले हे फोटो कोणत्या कार्यक्रमातील आहे, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र यातील प्रत्येक फोटोत तिने हॉलिवूडप्रमाणे पोज देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘माझे काही फिरंगी मित्र आणि हॉलिवूड स्टार्स’, असे कॅप्शन राखीने या फोटोंना दिले आहे. मात्र तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी एका नेटकऱ्याने म्हटलं, तू त्यांच्यासमोर लहान बाळ वाटतेस. तर एकाने हीच आपली संस्कृती आहे का? असा प्रश्न थेट राखीला विचारला आहे. याआधीही राखीने काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो अपलोड केले होते. त्यावरही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.
राखी सावंत ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती ऍक्टिव्ह असते. तिने बऱ्याचदा आपल्या नवऱ्याचा उल्लेख केला असला तरी त्याच्याबद्दल कुणाला फारशी माहिती नाही. त्यामुळे तिचा नवरा कोण हे एक रहस्य आहे. मात्र नुकतंच ‘एका मुलाखतीत राखीने बिग बॉस’च्या निर्मात्यांना विनंती करत म्हणाली की, “माझ्या पतीला खूप इगो आहे, रितेशला तुम्ही कॅनडावरून बोलवा आणि शो मध्ये माझ्या बरोबर सहभागी व्हायला सांगा. सलमान (खान) सर आणि बिग बॉस हे दोघेच त्याचा माज उतरवू शकतील.”