Ram Charan and Upasana Blessed with Baby Girl : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण व त्याची पत्नी उपासना कामिनेनी पालक झाले आहेत. उपासनाने आज (२० जून) एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. उपासनाला सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लग्नाच्या ११ वर्षांनंतर राम व उपासना आई-बाबा झाले आहेत. ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर चाहते राम व उपासनावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

लाडका विनोदवीर कोण? ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक ‘या’ कलाकारचं नाव घेत म्हणाले, “त्याचं झोकून देऊन काम करणं…”

उपासनाने हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील अपोलो हॉस्टिपटमध्ये मुलीला जन्म दिला. रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करत राम व उपासना एका मुलीचे पालक झाल्याची अधिकृत माहिती दिली. बाळाच्या जन्माच्या काही तास आधी राम चरणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने संगीतकार काल भैरवने त्यांच्या बाळासाठी बनवलेली एक ट्यून शेअर केली होती. तसेच त्याच्या व उपासनाच्या वतीने काल भैरवचे आभार मानले होते.

दरम्यान, उपासनाने मुलीला जन्म दिल्यानंतर साऊथचे मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा आता आजी-आजोबा झाले आहेत. सध्या त्यांच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. राम व उपासनाने ५ दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला. ११ वर्षांनी दोघांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे.