बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. यावर्षीचे बहुतेक सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले आहेत. याबद्दलच त्याने नुकतंच मत मांडलं आहे. चित्रपटसृष्टीत त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवरुनही बरीच नाराजी आपल्याला बघायला मिळत आहेत. ४० दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करणाऱ्या अक्षय कुमारला मध्यंतरी दिग्दर्शक बोनी कपूर यांनी टोला लगावला होता. शिवाय त्याच्या शिस्तप्रिय स्वभावाबद्दलही बॉलिवूडमध्ये बरंच बोललं जातं.

‘हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समीट’ या कार्यक्रमात संवाद साधताना अक्षय कुमारने या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला. दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण याने यावेळी अक्षय कुमार बरोबर संवाद साधला आणि त्यानेदेखील ‘आरआरआर’सारख्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव शेअर केला. ‘आरआरआर’ चित्रपटाच्या ओपनिंग शॉटसाठी तब्बल ३५ दिवस काम केल्याचा खुलासा यादरम्यान राम चरणने केला.

आणखी वाचा : शाहरुख, दीपिकानंतर रणवीर सिंगला मोरोक्कोमधील प्रतिष्ठित पुरस्काराने केलं गेलं सन्मानित; फोटो व्हायरल

याविषयी बोलताना राम चरण म्हणाला, “काही चित्रपट हे ४० दिवसांत पूर्ण होतात, अक्षय कुमार त्यांचे चित्रपट या कालावधीत पूर्ण करतात. पण काही चित्रपटांसाठी जास्त काळ लागू शकतो. ‘आरआरआर’मधील ओपनिंग शॉटसाठी आम्ही ३५ दिवस ३००० ते ४००० लोक सलग काम करत होतो. लहानपणापासूनच मला धुळीची प्रचंड अॅलर्जी आहे. माझी लहानपणी सायनसचि सर्जरीदेखील झाली आहे, पण माझं नशीब बघा याच धुळीत मला ३५ दिवस काम करावं लागतंय.”

View this post on Instagram

A post shared by RRR Movie (@rrrmovie)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच चित्रपट बनवण्याच्या प्रोसेसमध्ये बरेच बदल करायला हवेत असंही मत राम चरणने मांडलं. आपला चित्रपट हा भारतीय चित्रपट आहे आणि तो आता राज्यांच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार गेला आहे याचा अभिमान असल्याचंही राम चरणने स्पष्ट केलं. एक अभिनेता म्हणून राम चरण पुढे म्हणाला, “आम्हाला आमच्या चाहत्यांकडून मिळणारं प्रेम पाहून भरून येतं. स्टारडम ही एक सर्वात मोठी जबाबदारी आहे एक अभिनेता म्हणून ती जबाबदारी पेलता यायलाच हवी.”