‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामधला भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा डग्गुबती हा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. अवघ्या वर्षभरापूर्वीच त्याने त्याची लाँग टाईम गर्लफ्रेड मिहीका बजाजसोबत लग्न केले होते. या दोघांना आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करुन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. मात्र ते दोघेही काही न काही कारणांमुळे चर्चेत असतात. नुकतंच मिहीकाने लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

मिहिकाने शेअर केलेला हा व्हिडीओ लग्नाच्या संपूर्ण कार्यक्रमाचा आहे. राणा डग्गुबती आणि मिहिकाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात लग्नाच्या तयारीपासून सात फेऱ्यांपर्यंत सर्व घटना यात कैद करण्यात आल्या आहेत. या व्हिडीओत राणा डग्गुबती आणि मिहिकाचा हळदी सभारंभ, मेहंदी, संगीत यासारख्या सर्वच कार्यक्रमांची झलक पाहायला मिळत आहे.

यात ते दोघेही फार खूश असल्याचे पाहायला मिळत आहे. यात राणा डग्गुबती हा नवऱ्याच्या पोषाखात आणि मिहिका ही नवरीच्या पोषाखात फारच सुंदर दिसत आहे. यात राणाने संपूर्ण लग्न प्रथा परंपरेनुसार पार पडल्यानंतर त्याने तिला लिप किस केली आहे. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मिहिका म्हणाली, “परफेक्ट मॅच, सर्व गोष्टी एकत्र जोडून ठेवल्या आहेत,” असे तिने त्यावर म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्यावर्षी ८ ऑगस्ट रोजी राणा व मिहीका बजाज हा विवाहसोहळा पार पडला होता. मिहीका इंटिरिअर डिझायनर असून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीण आहे. मिहीकाचे वडिल हैदराबादमधील नामांकित सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. तर आई ज्वेलरी डिझायनर आहे.