बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. मात्र, आता रणबीरच्या लव्ह लाइफ विषयी अनेक लोक चर्चा करत आहेत. रणबीर आलिया आधी तिची जवळची मैत्रिणी कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तर त्याआधी तो दीपिका पदुकोणसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यात आता अशी माहिती समोर आली आहे की या आधी रणबीरच्या आयुष्यात या सगळ्यांच्या आधी एक मुलगी होती. तिच मुलगी नंतर रणबीरच्या एका मित्राची पत्नी झाली.

रणबीर कपूरच्या लव्हलाइफविषयी ही माहिती ‘एशियानेट’ने दिली आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर आधी अवंतिका मलिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, त्यानंतर अवंतिकाने बॉलिवूडचा पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा भाचा इमरान खानशी लग्न केले. दरम्यान, आता इमरान आणि अवंतिका देखील सोबत नाही आहेत. हे दोघे २०१९ मध्ये विभक्त झाले.

आणखी वाचा : ‘राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पासोबतचे संबंध ठीक नाहीत आणि…’, शर्लिन चोप्राचा धक्कादायक दावा

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीर आणि इमरान खूप चांगले मित्र आहेत. तर रणबीर आणि अवंतिका जवळपास ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही कारणांमुळे ते विभक्त झाले होते. त्यानंतर अवंतिकाच्या आयुष्यात इमरान आला आणि २०११ मध्ये त्यांनी लग्न केले. त्या दोघांना एक मुलगी आहे.