सोशल मीडियावर काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहणारा अभिनेता रणबीर कपूर सध्या पत्नी आलिया भट्टसोबत वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. पण आलिया त्याच्या आयुष्यात येण्याआधी रणबीर असा अभिनेता होता ज्याच्यवर लाखो तरुणी फिदा होत्या. पण एका मुलीचं तर त्याच्यावर एवढं प्रेम होतं की रणबीरशी लग्न करण्यासाठी ती त्याच्या घरी देखील पोहोचली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरनं या मुलीचा एक किस्सा शेअर केला.

एका मुलाखतीत रणबीरला त्याच्याबद्दल गुगल केले जाणारे जाणारे मजेदार प्रश्न विचारण्यात आले. ज्यात एक प्रश्न त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल होता. या प्रश्नाचं उत्तर देताना रणबीरनं त्याच्या एका चाहतीचा किस्सा शेअर केला. खरं तर ही किस्सा काही वर्षांपूर्वी रणबीरसोबत घडला होता. एक चाहती त्याच्याशी लग्न करण्यासाठी त्याचा घरी पोहोचल्याचा हा किस्सा त्याला त्याच्या वॉचमेननं सांगितला होता.

आणखी वाचा- कौतुकास्पद! प्रसिद्ध अभिनेत्री करतेय वारकऱ्यांची सेवा, व्हिडीओ चर्चेत

रणबीर कपूर म्हणाला, “एक मुलगी होती. त्या मुलीला मी कधीच भेटलो नाही ना तिला कधी पाहिलं आहे. पण मला हे माझ्या वॉचमेननं सांगितलं होतं की ती भटजींना घेऊन आली होती आणि तिनं माझ्या बंगल्याच्या गेटशी लग्न केलं होतं. त्यावेळी गेटवर काही फुलं पडलेली होती. गेटला टिळा लावलेला होता. हे सगळं खूपच क्रेझी होतं. त्यामुळे तसं पाहिलं तर मी माझ्या पहिल्या पत्नीला अद्याप भेटलेलो नाही. पण मला कधीतरी तिला भेटायचं आहे.”

आणखी वाचा- Alia Bhatt Announce Pregnancy : आलिया भट्ट होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाखतीत रणबीरनं बरेच मजेदार खुलासे केले. त्यानं या मुलाखतीत सांगितलं की तो लवकरच एक टॅटू गोंदवून घेणार आहे. हा टॅटू एकतर त्याचा लकी नंबर ८ चा असेल किंवा मग त्याच्या बाळांची नावं असतील. दरम्यान रणबीर कपूरनं आलिया भट्टशी १४ एप्रिल २०२२ ला लग्न केलं होतं. लवकरच दोघंही ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.