scorecardresearch

Video : बॉयकॉट ट्रेंड सुरु असताना रणबीरच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

मागच्या काही दिवसांपासून ‘ब्रह्मास्त्र’च्या विरोधात बॉयकॉट ट्रेंड सुरू आहे.

Video : बॉयकॉट ट्रेंड सुरु असताना रणबीरच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, नेटकऱ्यांनीही केले कौतुक
आतापर्यंत रणबीरचं नाव बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’च्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. त्याचा हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या प्रमोशनसाठी रणबीर चेन्नईला गेला होता. या प्रमोशन इव्हेंटचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यातील एका व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली आहे. एकीकडे सोशल मीडियावर चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी होत असतानाच नेटकरी आता रणबीर कपूरवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर सध्या रणबीर कपूरचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात रणबीर कपूरसह दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली हे देखील दिसत आहेत. या दोघांना भेटल्यावर रणबीर कपूरनं असं काही केलं की त्यासाठी त्याचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होताना दिसत आहे.
आणखी वाचा-“चित्रपटातील कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात” हृता दुर्गुळेने व्यक्त केली खंत

एकीकडे सोशल मीडियावर रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बॉयकॉट केला जात असताना, त्याच्या व्हायरल व्हिडीओने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर दाक्षिणात्य कल्चरप्रमाणे राजामौली आणि नागार्जुन यांना भेटल्यानंतर त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करताना दिसत आहे. हा व्हिडीओवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीर कपूरवर कौतुकाचा वर्षावर केला आहे. रणबीरचा हा अंदाज सर्वांच्या पसंतीस पडला असून त्याच्या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

नुकतंच चेन्नईमध्ये झालेल्या प्रमोशन इव्हेटच्या वेळी रणबीर कपूर, नागार्जुन, एस एस राजामौली यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी या तिघांनीही दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला. त्यांचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ शिवा या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा- Video : दाक्षिणात्य पद्धतीने जेवण केल्यामुळे रणबीर कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले “कितीही स्टंट केले तरी…”

रणबीर कपूर आणि अलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून बऱ्याच वर्षांनंतर नागार्जुन पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहेत. तर एस एस राजामौली या चित्रपटाच्या तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranbir kapoor touches ss rajamouli and nagarjuna feet video goes viral mrj

ताज्या बातम्या