scorecardresearch

“चित्रपटातील कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात” हृता दुर्गुळेने व्यक्त केली खंत

अभिनेते सुबोध भावे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना तिने ही खंत व्यक्त केली.

“चित्रपटातील कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात” हृता दुर्गुळेने व्यक्त केली खंत
अभिनेते सुबोध भावे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना तिने ही खंत व्यक्त केली.

छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जाते. हृताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे.‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ या दोन्ही चित्रपटांमुळे ती अजूनही प्रसिद्धीझोतात आहे. नुकतंच हृता दुर्गुळेने झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने मोठ्या पडद्यावरील कलाकार छोट्या पडद्यावरील कलाकारांना कमी समजतात, अशी खंत व्यक्त केली.

झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारासह राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता येत्या भागात अभिनेत्री हृता दुगुळे आणि तिच्या सासूबाई मुग्धा शाह या हजेरी लावणार आहेत. याचा एक प्रोमो नुकतंच समोर आला आहे. यावेळी अभिनेते सुबोध भावे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना तिने ही खंत व्यक्त केली.
आणखी वाचा : “प्रतीक माझे निर्णय…”, नाटकासह छोट्या पडद्यावरील एक्झिटवर हृता दुर्गुळेचे स्पष्टीकरण

या कार्यक्रमात सुबोध भावे यांनी हृताला चित्रपटात काम करणारे कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने पटकन हो असे म्हटले. त्यावर सुबोध भावेंनी काही क्षणात असे कोणते कलाकार आहेत, त्यांची नावं सांग असे विचारले. त्यावर तिने मी नाव सांगणार नाही, पण हे खरं आहे. सेटवर त्यांच्या वागण्या बोलण्यावरुन त्यांच्या वाइब्सवरुन कळतं, असे म्हटले.

आणखी वाचा : ‘टाइमपास-३’ पाहिल्यानंतर हृता दुर्गुळेच्या सासूबाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “आता तिच्यात…”

त्यावर सुबोध भावेंनी म्हटले की ते मोठ्या पडद्यावर दिसतात आणि तुम्ही छोट्या पडद्यावर म्हणून हा फरक आहे का? तर त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, मला का ते नेमकं माहिती नाही. पण सत्य परिस्थिती अशी आहे की मालिकेतील कलाकार हे फारच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. कारण ते दररोज घरी पोहोचतात. दरम्यान तिच्या या उत्तरावर प्रेक्षकांनीही तिला टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress hruta durgule bus bai bus programme talk about difference between serial and movie actors nrp

ताज्या बातम्या