बरेच सेलिब्रिटी अनेकदा बोलताना मागचा पुढचा विचार न करता एखादं वक्तव्य करून बसतात आणि मग त्यांच्यावर जाहीरपणे माफी मागण्याची वेळ येते. काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन अबीश मॅथ्यू याने त्याच्या जून्या ट्वीटसाठी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतींची माफी मागितली होती. या ट्वीटमध्ये मॅथ्यूने मायावतींबद्दल अपमानजनक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आलाय ज्यात अभिनेता रणदीप हुड्डा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावतींवर अश्लिल विनोद करताना दिसून आला.

या व्हिडीओमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा एका शो दरम्यान प्रेक्षकांना अश्लिल विनोद सांगत होता. याच दरम्यान तो म्हणाला, “तुम्हाला मी एक ‘डर्टी जोक’ सांगतो…मिस मायावती दोन लहान मुलांसोबत एका गल्लीमधून जात होत्या…तिथे उभा असलेल्या एका व्यक्तीने त्यांना विचारलं, हे दोन्ही मुलं जुळे आहेत का ? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, नाही, एक ४ वर्षाचा आहे आणि दुसरा ८ वर्षाचा आहे. त्यानंतर तो माणूस म्हणाला, मला विश्वासच होत नाही की एक व्यक्ती तिथे दोन वेळा जाऊ शकतो.”

इथे पहा अभिनेता रणदीप हुड्डाचा व्हिडीओ :

अभिनेता रणदीप हुड्डाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता लोकांना यावर विश्वास होत नाही. त्याच्या या व्हिडीओमुळे रणदीप सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता रणदीपने माफी मागावी, अशी मागणी नेटकऱ्यांनी केलीय.

पहा नेटकऱ्यांचे काही ट्वीट :

ज्या अभिनेत्याने त्याच्या दमदार अभिनय कौशल्यांच्या आधारे लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं, त्याच अभिनेत्याकडून असा अश्लिल विनोद ऐकायला मिळत असल्यानं त्याचे चाहते भलतेच नाराज झालेत. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘किक’, ‘साहेब बीबी और गॅंगस्टर’ सारख्या चित्रपटातून सपोर्टिंग आणि ‘सरबजीत’ मधून लीड रोलमध्ये झळकलेला रणदीपने आज कित्येक लोकांच्या मनातून उतरला आहे. नुकतंच रिलीज झालेल्या ‘राधे’ चित्रपटात सुद्धा रणदीप हुड्डाची महत्त्वपूर्ण भूमिका दिसून आली.