बॉलिवूडचा ‘हिरो नंबर १’ अशी ओळख असलेला अभिनेता गोविंदा तब्बल २५ वर्षांनंतर निर्माता आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यासोबत काम करणार आहे. ‘रंगीला राजा’ या चित्रपटामध्ये गोविंदा दुहेरी भूमिका साकारणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोविंदा आणि पहलाज निहलानी यांनी या चित्रपटापूर्वी ‘इल्जाम’, ‘शोला और शबनम’ आणि ‘आँखे’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘रंगीला राजा’ या चित्रपटामध्ये गोविंदाने राजा आणि योगी ही दुहेरी भूमिका वठविली आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरची सुरुवात गोविंदाने काम केलेल्या जुन्या चित्रपटांमधील काही गाण्यांनी होत आहे. हा ट्रेलर २४ तासामध्ये ६ लाख ५६ हजार वेळा पाहिला गेला आहे. राजस्थानच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेला हा चित्रपट येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, ‘राजा बाबू’, ‘आंटी नंबर १’, ‘बडे मिया छोटो मिया’ असे एकपेक्षा एक हिट चित्रपट गोविंदाने केले. हल्लीच्या ‘हप्पी एडिंग’, ‘किल दिल’ यांसारख्या चित्रपटातही त्यानं काम केलं पण यात गोविंदाच्या भूमिकेची फारशी चर्चा झाली नव्हती. तेव्हा पहलाज यांचा हा चित्रपट गोविंदाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर ‘नंबर वन’ बनवेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rangeela raja trailer govinda and pahlaj nihalani jodi coming back after 25 years
First published on: 18-10-2018 at 15:57 IST