लोकप्रिय यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाचं ब्रेकअप झालं आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादानंतर गर्लफ्रेंडने ब्रेकअप केल्याची पुष्टी रणवीरने केली आहे. रणवीरने ताज्या एपिसोडमध्ये तारा सुतारियाशी बोलताना प्रेमाबद्दल त्याचं मत व्यक्त केलं, तसेच आता सिंगल असल्याचंही सांगितलं.
रणवीर अलाहबादियाने कॉमेडियन समय रैनाच्या वादग्रस्त ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी आई-वडिलांच्या प्रायव्हसीवरून रणवीरने विनोद केला होता. शोमधील त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तो वादात सापडला होता. माफी मागितल्यानंतरही त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्याची चौकशी केली. या काळात, रणवीरच्या कामावरही परिणाम झाला. या वादानंतर तो आधीच्या तुलनेत कमी पॉडकास्ट करतोय.
प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले – रणवीर
ताराशी बोलताना रणवीरने प्रेम मिळवण्याबद्दल वक्तव्य केलं. “मला वाटतं की मी प्रेमासाठी खूप जास्त प्रयत्न केले. जर एखाद्याच्या मनात रोमान्सची तीव्र इच्छा आहे, तर त्याला तो मिळवायचाच असतो. ती तीव्र इच्छा माझ्या मनातही आहे, पण यामुळे मला खूप त्रास झाला. खरं तर मला एक पत्नी हवी होती. तिशीनंतर आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलतात. पण जे झालं ते माझ्या हातात नव्हतं. माझा लग्नाचा योग इतक्यात नाही, कारण मला खूप काम करायचं आहे,” असं रणवीर म्हणाला.
“एक पुरूष म्हणून, मी ती इच्छा दाबून टाकली आहे… मी खूप वेदना इतक्या खोलवर दाबून ठेवल्या आहेत, आणि त्यातील बराच त्रास हा प्रेमभंगाचा आहे. एखाद्या व्यक्तीने माझ्या आयुष्यात येऊन ते दुःख कमी करावं अशी आशा मला नाही. कारण तो अन्याय आहे. माझ्या आयुष्यातील महिला; माझी आई, माझी बहीण, माझी भाची, माझी मुलगी जी अजून यायची, त्यांना आयुष्याचा एका चांगला अनुभव मिळावा अशी माझी इच्छा आहे,” असं रणवीर अलाहाबादिया म्हणाला.
रणवीर अलाहाबादियाच्या एक्स गर्लफ्रेडचं नाव निक्की शर्मा होतं. रणवीरने तिचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते, पण तिचा चेहरा लपवला होता. मात्र, तिनेही त्याच कपड्यांमधील, त्याच ठिकाणावरून तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते, त्यानंतर निक्की व रणवीर रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण समयच्या शोमध्ये झालेल्या वादानंतर निक्कीने रणवीरशी ब्रेकअप केलं.