अभिनेता रणवीर शौरी आपल्या अभिनयासोबतच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असतो. सध्या त्याने राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. पण त्याच्या या ट्विटमुळेच सध्या तो ट्रोल होत आहे. पण त्यानेही गप्प न बसता ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या पश्चिम बंगालमधल्या सर्व सभा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला होता. रणवीरने त्यांच्या या निर्णयाचं कौतुक करत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, “सभा रद्द करुन राहुल गांधींनी चांगला मेसेज दिला आहे जरी त्या राज्यात जिंकण्याची काहीही शक्यता नसली तरीही!”

त्याच्या या ट्विटवरुन तो चांगलाच ट्रोल झाला.एक युजर म्हणतो, “अरे तुम्ही अजून जिवंत आहात? कसं काय? कण्याशिवाय माणूस कसा काय जगू शकतो? ” यावर रणवीरने सडेतोड उत्तर दिलं आहे. तो लिहितो, “कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही”.

तर एका युजरने त्याला कंगना रणौतचं मेल व्हर्जन म्हटलं आहे. तर यावर रणवीरने उत्तर न देता एक जीआयएफ शेअर केलं आहे, ज्यात अक्षय कुमारचा फोटो आहे आणि त्यावर लिहिलं आहे, “जली ना तेरी!”

रणवीरने गेल्यावर्षी कंगनाची बाजू घेत प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, कंगनाच्या बोलण्यामुळे अनेक बदल घडत आहेत त्यामुळे तिला शांत बसायला सांगू नये.