रणवीर सिंग बॉलिवूडमधल्या टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने ‘बाजीराव मस्तानी’, ‘गली बॉय’, ‘सिंबा’, ‘पद्मावत’ असे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. रणवीर हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वात उत्साही नट आहे. देशभरात त्याचे चाहते आहेत. रणवीर सिंगचा जॉली स्वभाव सर्वश्रुत आहे. तो ज्या ठिकाणी जातो, तिथल्या लोकांना जवळचा वाटायला लागतो. ’83’ या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वात्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तो सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये गुंतलेला आहे.

नुकताच पार पडलेल्या ‘SIIMA’ (South Indian International Movie Awards) या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या पुरस्कार सोहळ्याला रणवीर सिंग हजर होता. या पुरस्कार सोहळ्याची तुलना फिल्मफेअरशी केली जाते. SIIMA या पुरस्कार सोहळ्याला अल्लू अर्जुन, शिवा राजकुमार, विजय देवरकोंडा, नवीन पॉलीशेट्टी यांच्यासह दक्षिणेकडील अनेक कलाकार उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये रणवीरला ‘दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदी अभिनेता’ हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबरोबरचा एक फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहे.

Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: “मुंबईचा राजा…” अहमदाबादमध्ये रोहित शर्माच्या चाहत्यांनी केलं हार्दिक पांड्याला ट्रोल, VIDEO व्हायरल
Aditya Roy Kapur Attended Alanna Baby Shower
अनन्या पांडेच्या बहिणीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला पोहोचला बॉयफ्रेंड आदित्य कपूर, व्हिडीओ आला समोर

या पुरस्कार सोहळ्यात रणवीरने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील सुप्रसिद्ध डायलॉग त्याच्यासमोरच म्हणून दाखवला. तसेच तो सूत्रसंचालकांसह अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’ या गाण्यावरही नाचला. रणवीरचा श्रीवल्ली गाण्यावर नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. SIIMA मध्ये मानाने दिलेल्या पुरस्काराबद्दल रणवीर सिंगने आभार मानत आपले मत व्यक्त केले आहे. त्याने “एक कलाकार म्हणून मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. आपल्या देशातील प्रत्येक राज्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. देशामध्ये असलेली ही सांस्कृतिक विविधता मला फार आवडते. दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. एक असा काळ होता, जेव्हा भाषेचा अडथळा व्हायचा. पण आता अशी कोणतीच बाब राहिलेली नाहीये,” असं तो म्हणाला.

रणवीर सिंगने या पुरस्कार सोहळ्यामध्ये कन्नड सुपरस्टार ‘शिवा राजकुमार’ आणि तेलुगू सुपरस्टार ‘विक्रम देवरकोंडा’ यांच्यासह त्याच्या ‘रामलीला’ या चित्रपटामधील ‘ततड ततड’ या गाण्यावर नाचला. SIIMA 2022 हा पुरस्कार सोहळा रविवारी बंगळुरूमध्ये पार पाडला.