बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि पत्नी दीपिका पादुकोण यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नुकताच रणवीरचा ‘द बिग पिक्चर’च्या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यात रणवीरने त्याच्या लग्नाबद्दल आणि मुलांच्या नावाचा विचार करायला सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

या प्रोमोमध्ये रणवीर त्याच्या लग्नाविषयी आणि मुलांविषयी बोलताना म्हणतो, “तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की माझं लग्न झालं आहे आणि आता २-३ वर्षात माझी मुलं होतील. भाऊ, तुमची वहिनी दीपिका लहान असताना इतकी सुंदर होती. मी रोज तिच्या लहानपणीचा फोटो पाहतो आणि म्हणतो की मला अशीच एक मुलगी देना माझं आयुष्य बदलून जाईल. मी तर नाव शॉर्टलिस्ट करत आहे. जर मी तुमचं नाव शौर्य त्या लिस्टमध्ये समाविष्ट केलं तर तुम्हाला काही हरकत नाही ना?”

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथाने केली मोठी घोषणा!

आणखी वाचा : Bigg Boss 15 : “नाही मी पण म्हातारा आहे…”, अफसानावर संतापला सलमान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोच्या सुरुवातीला रणवीर स्पर्धकासह ‘राम लीला गोलियों की रासलीला’ या चित्रपटातील ‘ततड़ ततड़’ या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर रणवीर स्पर्धकाची ओळख करून देतो आणि म्हणतो, “कृपया लक्षात घ्या. त्याचा स्वॅग खूप भारी आहे आणि त्याचा अंदाज शहरात चर्चेचा विषय राहिली आहे. कृपया गोरखपूर, उत्तर प्रदेश येथील अभय सिंह यांचे स्वागत करा. “