scorecardresearch

दीपिका- रणवीरच्या वैवाहिक आयुष्यात वादळाच्या चर्चांना पूर्णविराम, अभिनेत्यानं दिली प्रतिक्रिया

वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याच्या चर्चांवर रणवीरने मौन सोडलं आहे.

दीपिका- रणवीरच्या वैवाहिक आयुष्यात वादळाच्या चर्चांना पूर्णविराम, अभिनेत्यानं दिली प्रतिक्रिया
मागच्या काही काळापासून दीपिका आणि रणवीर यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत.

बॉलिवूडमधील काही लोकप्रिय जोड्याबद्दल बोलायचं झाल्यास रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचं नाव नेहमीच आघाडीवर असतं. दोघांनीही काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. लग्नानंतरही ही जोडी कायम चर्चेत राहिली आहे. पण मागच्या काही काळापासून दीपिका आणि रणवीर यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. अशातच एका मुलाखतीत रणवीरने या सर्व चर्चांवर मौन सोडत पती- पत्नीतील संबंध कसे आहेत यावर मनमोकळेपणे भाष्य केलं.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर रणवीर आणि दीपिका यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल उटल- सुलट चर्चा सुरू होत्या. या दोघांच्या नात्यात दुरावा आला असून दोघंही वेगळे होण्याच्या विचारात असल्याचं बोललं गेलं होतं. पण आता रणवीरचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर म्हणाला, “देवाची कृपा आहे… आम्ही दोघं एकमेकांना भेटलो आणि २०१२ मध्ये डेट करायला सुरुवात केली आज दहा वर्षांनंतर २०२२ पर्यंत आम्ही एकमेकांना डेट करत आहोत.”

आणखी वाचा- “कधीकधी आत्महत्या करण्याचा विचार यायचा…”, ‘त्या’ कठीण काळाबद्दल दीपिका पदुकोणचे वक्तव्य

रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या चर्चा केवळ अफवा असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय अलिकडेच एका अवॉर्ड शोमध्ये रणवीर आणि दीपिकाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला होता. फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्या पुरस्कार स्वीकारताना रणवीरने या यशाचं सगळं श्रेय पत्नी दीपिकाला दिलं होतं. तसेच तीच त्याची सर्वात मोठी ताकद असल्याचंही म्हटलं होतं.

दरम्यान दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचं लग्न २०१८ मध्ये झालं होतं. त्याआधी जवळपास ६ वर्षं ते दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. कामाबद्दल बोलायचं तर दीपिका पदुकोण आगामी काळात शाहरुख खानसह ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती हृतिकसह ‘फायटर’मध्येही दिसणार आहे. रणवीरबाबत बोलायचं तर तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या