बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचे नाव कायमच चर्चेत असते. ते दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते दोघेही एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत व्यक्त होताना दिसतात. नुकतंच रणवीर सिंहने त्याच्या अधिकृत ट्विटर एक व्हायरल होणारा रिल व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

रणवीर सिंहने शेअर केलेला हा व्हिडीओ एका लहान मुलीचा आहे. या व्हिडीओत ती लहान मुलगी रणवीर आणि दीपिकाच्या रामलीला या चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसत आहे. रामलीला चित्रपटामधील रणवीर आणि दीपिकाच्या एक सीनमधील सर्व शब्द ती त्याच स्वरात बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ रणवीरने ट्विटरवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना रणवीरने त्याला अनोखे कॅप्शनही दिले आहे. “लीलासारखी कोणीही नाही. पण दीपिका पदुकोण तू ही लहानपणीची दीपिका पाहिलीस का? मला तुझे हावभाव आवडले”, असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यासोबत त्याने ‘छोटी दीपिका’ असा हॅशटॅगही दिला असून त्याने हा व्हिडीओद्वारे दीपिकाला टॅगही केले आहे.

“मी तिच्या गालाला स्पर्श…”, रणबीर कपूरने सांगितला ऐश्वर्या रायसोबत रोमान्स करतानाचा ‘तो’ अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गोलियों की रासलीला राम-लीला हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दीपिका आणि रणवीर हे दोघंही मुख्य भूमिकेत झळकल्याचं पाहायला मिळालं. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. गुजरात प्रांतातील सनेडा-रजाडी या दोन समाजांमध्ये असणारं तणावाचं वातावरण आणि त्यातून खुलणारं ‘राम-लीला’चं प्रेम याभोवती या चित्रपटाचं कथानक आधारित होतं.