scorecardresearch

शमिता-राकेशचा व्हॅलेंटाइन डेचा फोटो पाहून पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धी म्हणाली…

व्हेलेंटाइन डेच्या निमित्ताने राकेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला फोटो शमिताने पोस्ट केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट हे सध्या बीटाउनमधील चर्चेतील कपल आहे. या दोघांची ओळख बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमध्ये झाली होती. पण शोमधून बाहेर पडल्यानंतरही शमिता आणि राकेश सतत एकत्र फिरताना दिसतात. त्यांच्यामधील जवळीक वाढत आहे. आता हे दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. शमिताने व्हॅलेंटाइन डेला शेअर केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. ही पोस्ट पाहून राकेशची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धी डोगरने प्रतिक्रिया दिली आहे.

व्हेलेंटनइन डेच्या निमित्ताने राकेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला फोटो शमिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात शमिताने राकेशचा हात पकडलेला दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चांगल्या हातात.’ ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि त्यामुळेच या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
आणखी वाचा : मलायका- अर्जुनचा व्हॅलेंटाइन डे स्पेशल फोटो पाहून ट्विंकल खन्ना म्हणाली…

दरम्यान, शमिताच्या या पोस्टवर राकेशची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धी डोगरने कमेंट करत प्रतिक्रिया दिला आहे. तिने नजर लागू नये त्यासाठी वापरण्यात येणारा इमोजी वापरला आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शमिता शेट्टी जास्तीत जास्त वेळ राकेश बापटसोबत व्यतित करताना दिसत आहे. दोघांनाही सातत्यानं मुंबईमध्ये एकत्र स्पॉट केलं जात आहे. अलिकडेच ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शमितानं तिचं रिलेशनशिप स्टेटस आणि लग्नाच्या प्लानिंगवर भाष्य केलं होतं. शमितानं या मुलाखतीत लग्न करून आयुष्यात सेटल होण्याची तसेच आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

राकेश आणि रिद्धिची ओळख २०१०मध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘मर्यादा’च्या सेटवर झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना डेट करत होते. एक वर्षानंतर २०११मध्ये त्यांनी लग्न केले. ते सर्वांचे लाडके कपल होते. पण लग्नाच्या ८ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. २०१९मध्ये ते दोघे विभक्त झाले. त्यानंतर आता राकेश शमिता शेट्टीला डेट करत आहे. ते लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raqesh bapat share romantic video with shamita shetty this is how ex wife ridhi dogra react avb

ताज्या बातम्या