दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमी चर्चेत असते. या नॅशनल क्रशने ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनयामुळे सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर ‘गुडबाय’ या चित्रपटाद्वारे रश्मिकाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. एकीकडे रश्मिकाचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे मात्र तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’चा ट्रेलर पाहताना क्रितीच्या ‘त्या’ कृतीने वेधले सर्वांचे लक्ष, व्हिडीओ व्हायरल

रश्मिका मंदानाची बर्गरची जाहिरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका जंक फूड ब्रॅण्डची ही जाहिरात असून या व्हिडीओमध्ये रश्मिका चिकन बर्गर खाताना दिसत आहे. खरे तर यापूर्वीच्या अनेक मुलाखतींमध्ये रश्मिकाने मांसाहार करीत नसल्याचे सांगितले होते. एकीकडे “मी शाकाहारी आहे… मांसाहार करीत नाही” असे सांगून दुसरीकडे चिकन बर्गर खात, जंक फूड प्रमोट केल्यामुळे नेटकरी रश्मिकाला ट्रोल करीत आहेत.

हेही वाचा : “लग्नाला बोलवणार का?” पापाराझींच्या प्रश्नावर राघव-परिणीती म्हणाले…

रश्मिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर रश्मिकाच्या जुन्या मुलाखतींचे काही व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहेत. यामध्ये ती स्वत: “जंक फूड आणि मांसाहार करीत नाही,” असे सांगताना दिसत आहे. यावर कमेंट करीत एका युजरने लिहिले आहे की, “पैशांसाठी हे सेलेब्रिटी काहीही करू शकतात”, तर दुसरा एक युजर म्हणतोय, “एरवी जंक फूडला नको म्हणणारी रश्मिका आता त्याची जाहिरात करीत आहे.” तसेच अनेकांनी “रश्मिका किती खोटे बोलतेस” अशा प्रतिक्रिया देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “‘द केरला स्टोरी’ला मराठी सिनेसृष्टी पाठिंबा का देत नाही?” अमृता खानविलकर म्हणाली “कारण ‘महाराष्ट्र शाहीर’…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गुडबाय’ चित्रपटातून पदार्पण केलेली रश्मिका लवकरच रणबीर कपूरसोबत ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकणार आहे. तसेच ती अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा-२’ मध्येही मुख्य भूमिकेत दिसेल.