तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात तरुण आणि लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रश्मिकाच्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयाची खूप प्रशंसा झाली आहे. तरी तिला बऱ्याच ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. नुकतंच रश्मिकाने यावर भाष्य केलं आहे. मध्यंतरी तिने ‘कांतारा’ चित्रपट पाहिला नव्हता म्हणून तिच्यावर लोकांनी टीका केली होती.

नुकतंच एका मुलाखतीमध्य रश्मिकाने यावर भाष्य केलं आहे आणि तिच्यामते लोकांना तुम्ही केलेलं प्रत्येक काम, कृती, भाष्य कायम आवडेलच असं नाही. रश्मिकाला ‘कूर्ग पर्सन ऑफ द २०२२’ म्हणून सन्मानितही केलं गेलं, यावरून बऱ्याच लोकांनी तिच्यावर टीका केली. ‘बॉलिवूड बबल’शी संवाद साधताना रश्मिकाने याबद्दल स्पष्टीकरण दिलं.

आणखी वाचा : अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘तेजाब’च्या रिमेकची घोषणा; ‘हे’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

ती म्हणाली, “मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आम्ही कलाकार सगळ्यांना आवडूच हा हट्ट धरणं योग्य नाही. त्यासाठी तुम्ही जबाबदार नाहीत. त्यामुळे बरीच लोक तुमचा तिरस्कार करणार हे नककी. शिवाय हीच लोक तुमच्यावर भरभरून प्रेमही करतील. आम्ही सेलिब्रिटीज आहोत, आम्हीच लोकांशी संवाद साधतो. हा सेलिब्रिटी असण्याचा शाप आहे आणि वरदानसुद्धा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय या मुलाखतीमध्ये काही लोक तिरस्कार करत असूनसुद्धा चाहत्यांकडून तिला मिळालेलं प्रेम याबद्दल रश्मिकाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजयच्या ‘वारीसु’ या चित्रपटात रश्मिका झळकणार आहे. हा चित्रपट मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच ‘मिशन मजनू’, ‘पुष्पा – द रुल’ आणि ‘अॅनिमल’ या चित्रपटातही रश्मिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.