सध्या सगळीकडे नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. गेली दोन वर्ष सण समारंभ साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले होते. यंदा लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्र म्हंटल की आठवतो तो गरबा, यंदा ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन केलेले आहे. तसेच शेवटचे दोन दिवस १२ वाजेपर्यंत गरबा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गरब्यामध्ये आवर्जून नाव घेतले जाते ते फाल्गुनी पाठक या गायकीचे. सध्या ती चर्चेत वेगळ्या कारणासाठी आहे. फाल्गुनी पाठक यांच्या गाण्याचे नेहा कक्कर या गायिकेने आपल्या पद्धतीने नव्या रूपात सादर केले आहे. यावरून दोघींमध्ये वाद रंगला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फाल्गुनी पाठक यांच्या दांडियाची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. पुष्पाफेम अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने मुंबईमध्ये आयोजित केलेल्या दांडिया कार्यक्रमात आपले हजेरी लावली होती. फाल्गुनी पाठकदेखील या दांडियात परफॉर्म करत होत्या. दोघींच्या उपस्थितीने दांडिया खेळायला आलेल्या लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. रश्मिकाने सामे या गाण्यावर ठेकादेखील धरला. रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती असं म्हणते संध्याकाळ छान गेली तसेच नवरात्रीच्या शुभेच्छादेत फाल्गुनी पाठकी यांना टॅग केले.

Vikram vedha : राकेश रोशन यांनी केवळ मुलाचे नव्हे तर संपूर्ण टीमचे केले कौतुक, म्हणाले “हा चित्रपट.. “

सध्या ती तिचा आगामी चित्रपट ‘गुडबाय’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ‘गुडबाय’मध्ये ती अमिताभ बच्चन यांच्यासह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ती ‘डीआयडी’ शोमध्ये पोहोचली होती. येथे तिने सुपरस्टार गोविंदा यांच्यासह धम्माल डान्स केला. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. रश्मिका मंदानाचा ‘गुडबाय’ चित्रपट ७ ऑक्टोबर २०२२ ला प्रदर्शित होत आहे.

रश्मिका मंदाना अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. आता याच चित्रपटाच्या पुढील भागाचे चित्रीकरण ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार आहे. नुकतीच ती ‘सीता रामम’ या दाक्षिणात्य चित्रपटात दिसली होती. तिचे चाहते आता पुढील चित्रपटाची वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna has evening with dandiya queen falguni pathak spg
First published on: 28-09-2022 at 16:21 IST