दक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. रश्मिका ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानंतर ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. रश्मिका ही सध्या अभिनेता विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका अनेकदा एकत्र दिसतात. मात्र या दोघांनीही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका हे दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. या दोघांचे अफेअर सुरु असल्याचे अनेक अफवा पसरत आहेत. मात्र त्या दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. ते दोघेही अनेकदा मुंबईत डिनर डेटसाठी किंवा गोव्याच्या ट्रिपवर जाताना दिसले होते. पण एकदा एका मुलाखतीत रश्मिकाने ती विजयला घाबरत असल्याचा खुलासा केला होता.

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटात ते एकत्र झळकले होते. पण एकदा एका मुलाखतीत रश्मिकाने ती विजयला घाबरत असल्याचा खुलासा केला होता. ‘डिअर कॉम्रेड’च्या प्रमोशनदरम्यान रश्मिकाने हे वक्तव्य केलं होतं.

“मी जेव्हा विजयला भेटली तेव्हा त्याला बघून मी फार घाबरली होती. पण त्यानंतर मला कळले की तो खूप ‘चिल फेलो’ आहे. आमची विचारसरणी एकमेकांशी जुळते. विशेष म्हणजे आमच्या मैत्रीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मला विजयला समजून घेण्यासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत”, असे रश्मिका म्हणाली.

‘छोट्या दीपिका’ने जिंकले रणवीर सिंहचे मन, पत्नीला व्हिडीओ टॅग करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रश्मिका आणि विजय यांची जोडी चित्रपटातच नाही तर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. मात्र हे दोघंही नेहमीच आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं सांगताना दिसतात.