बॉलिवूड असो किंवा मग दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, सेलिब्रेटी म्हटलं की ग्लॅमर आणि फॅशन या गोष्टी आल्याच. हे कलाकार नेहमीच मुलाखत, चित्रपट प्रमोशन किंवा इतर कोणत्याही खास कार्यक्रमात इतरांपेक्षा हटके दिसण्यासाठी सर्वांपेक्षा वेगळी फॅशन करण्यावर भर देतात. पण याच स्टाइल, फॅशन किंवा हटके ड्रेसच्या नादात अनेकदा त्यांना लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. एका मुलाखतीत रश्मिकाला अशाप्रकारच्या उप्स मूमेंटला सामोरं जावं लागलं.

एका चॅट शोमधील रश्मिकाच्या उप्स मूमेंटचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या शोमध्ये रश्मिकानं पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता. पण ऐनवेळी या ड्रेसमुळे तिला उप्स मूमेंटला सामोरं जावं लागलं. मुलाखती दरम्यान रश्मिकाचा ड्रेस वर सरकला आणि ती उप्स मूमेंटची शिकार झाली. अशाप्रकारचा ड्रेस घालणं तिच्यासाठी डोकेदुखी ठरलं. त्यानंतर रश्मिका सातत्यानं तिचा ड्रेस व्यवस्थित करताना दिसली.

सध्या रश्मिकाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अशा प्रकारे शॉर्ट ड्रेस घालण्यावरून काही युजर्सनी तिच्यावर टीका देखील केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला रश्मिकाचा ‘पुष्पा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटातील रश्मिकाच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रश्मिकाच्या कामाबद्दल बोलायचं तर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील यशस्वी अभिनय कारकिर्दीनंतर ती आता बॉलिवूड पदार्पण करणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पाऊल टाकत आहे. याशिवाय आगामी काळात तिच्याकडे ‘Aadavallu Meeku Johaarlu’, ‘गुडबाय’, ‘पुष्पा २’ हे चित्रपट आहेत.