दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिका नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिका ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्ली ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातली अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. नुकताच रश्मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण यावेळी रश्मिका चांगल्या कारणामुळे नाही तर एका लहान मुलीला मदत न केल्यामुळे ती ट्रोल झाली आहे.

रश्मिकाचा हा व्हिडीओ फिल्मी ग्यान या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. रश्मिका एका रेस्टॉरंटनंमधून बाहेर येते. त्यावेळी तिच्यासमोर अनेक लहान मुलं येतात. त्यावेळी रश्मिकाकडे ते लोक पैसे मागतात. पण रश्मिका लक्ष देत नाही. ती फोटोग्राफर्सकडे पाहते आणि हसून निघून जाते. यावेळी एक मुलगी रश्मिकाला बोलते दीदी कुछ पैसे दे दो खाना खाना है, तरी सुद्धा रश्मिका त्या मुलीला पैसे देत नाही आणि तिथून निधून जाते.

आणखी वाचा : Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स

आणखी वाचा : काका बसुया, रिश्ता पक्का करूया; तोडक मोडक मराठीत करण कुंद्राने तेजस्वीच्या आई-वडिलांसमोर घातली लग्नाची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रश्मिकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “काही पैसे दिले असते तर काय झालं असतं.” दुसरा नेटकरी म्हणाला, “मुलांना काही खायला दिलं असतं, तर काय झालं असतं.” तिसरा नेटकरी म्हणाला, “पैशांनी श्रीमंत आणि मनाने गरीब आहेत.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “कमीत-कमी १०० रुपये तरी दिले आहे”, अशा अनेक कमेंट करत रश्मिका ट्रोल झाली आहे.